Cylinder Blast in Curchorem Dainik Gomantak
गोवा

Cylinder Blast: कारेमड्डीत घरगुती सिलिंडरचा स्फोट! साडेतीन लाखांचे नुकसान

एक व्यक्ती जखमी

Kavya Powar

Cylinder Blast in Curchorem: कारेमड्डी कुडचडे येथील जामा मशिदजवळील इम्तिहाज सरमादी यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये किचन पूर्णपणे जळाले असून एक व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेत साडेतीन लाखांचे नुकसान झाले.

माहितीनुसार, इम्तिहाज यांच्या घरी काही कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकाचे काम सुरू होते. यावेळी एक सिलेंडर लिक झाला. त्याचदारम्यान बाजूलाच दुसऱ्या शेगडीवर जेवण शिजत होते. त्यामुळे लिक झालेल्या सिलेंडरने पेट घेतली.

ही आग इतकी भीषण होती की यामध्ये संपूर्ण किचन जळाले. दरम्यान, सरमादी यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांपैकी स्वयंपाकघरात मदतीला म्हणून थांबलेली मुलगी जखमी झाली.

या आगीत किचनमधील डायनिंग टेबल, फ्रीज, कपाट असे सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे साडेतीन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT