Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Updates: ‘जवाद’ चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम होणार नाही

पुढील 3-4 तासांत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पुढील पाच दिवस राज्यात पावसाची (Goa Rain Updates) शक्यता नसली तरी शनिवारी काही भागांत तुरळक सरींनी हजेरी लावली. त्यामुळे 24 तासांत 4.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. आंध्र प्रदेशात वादळाने हाहाकार उडवला असला तरी त्याचा गोवा राज्यावर परिणाम होणार नाही. पण तुरळक सरी बरसतील, असे गोवा हवामान वेधशाळेने (IMD Goa) म्हटले आहे. शनिवारी म्हापसा, पेडणे, वाळपई, मडगाव आणि सांगे परिसरात तुरळक सरींनी हजेरी लावली. सध्या तापमानात घट होत आहे. मात्र पुढील 3-4 तासांत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आंध्र, ओडिशाच्या किनारी मुसळधार

‘जवाद’ या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार पावसाला सुरूवात झाली असून हे वादळ आज पुरीच्या किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी त्याचे रूपांतर हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. येत्या चोवीस तासामध्ये या वादळाच्या प्रभावामुळे ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिवृष्टी होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT