Cyber Fraud Dainik Gomantak
गोवा

Cyber Fraud: फेक क्राईम ब्रँच ऑफिसर, 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी अन् 42 लाखांवर डल्ला; भामट्याचा गेम ओव्हर, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Digital arrest cyber fraud: पैंगीण येथील अनिल टेंसेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल ४२ लाख ६० हजार ९४ रुपयांचा गंडा घालणाऱ्या तेजस नरहरे (वय ३६, रा. मालेगाव रोड, नांदेड) याला अटक केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : पैंगीण येथील अनिल टेंसेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल ४२ लाख ६० हजार ९४ रुपयांचा गंडा घालणाऱ्या तेजस नरहरे (वय ३६, रा. मालेगाव रोड, नांदेड) याला अटक केली आहे.

याप्रकरणी पैंगीण येथील रहिवासी अनिल टेंसे यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी २० मार्च रोजी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३०८ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

तक्रारीनुसार, ३० जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत संशयिताने विविध व्हॉट्स ॲप क्रमांकांवरून तक्रारदाराशी संपर्क साधला. संशयिताने आपण केंद्र सरकारचा दूरसंचार विभाग आणि मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले होते. तक्रारदाराचे आधार कार्ड जेट एअरवेजचे नरेश गोयल यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहार आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरल्याची भीती भामट्याने दाखवली.

नंतर तक्रारदाराला ‘डिजिटल अरेस्ट’खाली ठेवून कारवाई टाळण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी एकूण ४२,६०,०९४.४० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत भरण्यास भाग पाडले होते. संशयिताला न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलिस कोठडी मागण्यात आली आहे. या आंतरराज्य सायबर गुन्हेगारी टोळीत आणखी कितीजणांचा सहभाग आहे आणि या प्रकरणातील रक्कम कोठे वर्ग केली याचा अधिक तपास सायबर पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Viral Video: हातात काठी नाही, मनात भीती नाही! महिलांनी चक्क अजगराला दोरीने बांधलं अन् शेताबाहेर नेलं; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांना जनतेचा वेढा

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

SCROLL FOR NEXT