online job fraud Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: 'वर्क फ्रॉम होम'चा धोका! महिलेला 4.35 लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा

Work From Home Scam: डिजिटल कन्सल्टिंग आणि इंजिनिअरिंग कंपनीतून बोलत असल्याचे भासवून गुन्हेगारांनी व्हॉट्सॲपद्वारे महिलेला संपर्क साधला

Akshata Chhatre

पणजी: सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा एका महिलेला 'वर्क फ्रॉम होम'चे आमिषाने गंडा घातला आहे. पणजीतील एका महिलेला 'चांगले उत्पन्न' मिळवण्याच्या नादात तब्बल ४.३५ लाख रुपयांहून अधिक रक्कम गमवावी लागली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डिजिटल कन्सल्टिंग आणि इंजिनिअरिंग कंपनीतून बोलत असल्याचे भासवून गुन्हेगारांनी व्हॉट्सॲपद्वारे महिलेला संपर्क साधला होता.

'वर्क फ्रॉम होम'च्या नावाखाली होणाऱ्या फसवणुक

घरातून काम करण्याची संधी असल्याचे सांगून, आरोपींनी महिलेला टेलिग्राम ॲप डाउनलोड करून एका ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगितले. कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे नाटक करत, आरोपींनी महिलेला गुगलपे आणि एनईएफटी ॲपद्वारे काही रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले. चार लाखांहून अधिक रुपये पाठवल्यानंतर, महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने त्वरित पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घडली होती, पण या वर्षी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे 'वर्क फ्रॉम होम'च्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

फसवणुकीला बळी पडत असल्यास..

राज्यात वाढलेल्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी गोवा पोलीस प्रशासनाने सध्या जनजागृतीवर भर दिला आहे. गेल्या वर्षभरात सायबर गुन्ह्यांद्वारे राज्यात एकूण १०१ कोटी रुपयांची फसवणूक झालीये आणि तक्रार केलेल्या लोकांना मदत करत १० कोटी रुपये वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर बिरादार यांनी राज्यातील सायबर गुन्हे आणि पोलिसांनी केलेली उपाययोजना यावर भर दिला आणि अशा फसवणुकीला बळी पडत असल्यास १९३० क्रमांकावर संपर्क करून मदत मिळवावी असे आवाहन केले आहे. याशिवाय तक्रारदार स्थानिक पोलीस स्थानकात संपर्क करू शकतात किंवा एनसीआरपी पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकतात अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT