Cyber Crime Threat  Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: सावधान!! AI गुन्हेगारांसाठी देखील ठरतंय फायदेशीर; नवीन वर्षात सायबर गुन्ह्यांचा धोका वाढण्याची शक्यता

Cyber Crime Threat: येणाऱ्या वर्षात AIचा वापर करून अनेक गुन्हे घडण्याची शक्यता आहे.

Akshata Chhatre

Cyber crime threats in 2025

पणजी: नवीन वर्ष सुरु व्हायला अगदी काहीच दिवस बाकी आहेत. नवीन वर्ष सुरु होणार म्हणून आपण बरेच आतुर असतो मात्र लक्षात घ्या येणाऱ्या नवीन वर्षात सायबर गुन्हांपासून सार्वधिक सुरक्षित राहावं लागणार आहे. फोर्टीनेट या सायबर सेक्युरिटी कंपनीने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या वर्षात AIचा वापर करून अनेक गुन्हे घडण्याची शक्यता आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल एक अहवाल फोर्टीनेट कडून जाहीर करण्यात आला आहे आणि या अहवालात त्यांनी येणाऱ्या नवीन वर्षात सायबर गुन्हे आणखीन भयंकर असण्याची शक्यता वर्तवली आहे.

सामान्य लोकांना फसवण्यासाठी हे गुन्हेगार लार्ज लॅंग्वेज मॉडेलचा वापर करत आहेत आणि यामुळे सामान्य लोकांना फसवणं किंवा आपण किती खरे आहोत हे पटवून देणं गुन्हेगारांसाठी सोपं झालंय. काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारांनी पत्रकारांची खोटी ओळख तयार केली होती शिवाय अनेक मोठ्या मंत्र्यांच्या नावे फसवेगिरी केल्याचे अनेक गुन्हे वेळोवेळी नोंद होत आहेत.

सायबर गुन्हेगार अशा खोट्या ओळखी वापरून सामान्य लोकांना लुबाडतात, त्यांच्याकडून भली मोठी रक्कम मिळवतात. पोलिसांकडे सायबर गुन्ह्यांच्या अनेक तक्रारींची नोंद झालेली असून देखील यावर हवा तसा आळा बसलेला नाही.

सायबर गुन्हेगार AI चा वापर करून तुमच्याबदल संपूर्ण माहिती काढून घेऊ शकतात. तुम्ही कोण आहात, तुमची आवड काय आहे किंवा तुम्ही काय पाहणं पसंत करता याची इतंभूत माहिती गुन्हेगारांजवळ असते ज्याचा गैरपवर लुबाडण्यासाठी केला जातो. AI चा वापर करून बनवलेल्या ओळखीमुळे खऱ्या खोट्याचा फरक करता येत नाही आणि लोकं अगदी सहज बळी पडतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे भाषा, व्याकरण किंवा आणखीन चुका होत नाहीत आणि परिणामी लोकं अगदी सहज फसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT