Cutbona Jetty Inspection|Restriction  Canva
गोवा

Cutbona Jetty: कुटबण- मोबोर येथे आणखी ४ कॉलराबाधित सापडले! 'संख्‍या १८७' वर

Cutbona Mobor Cholera Cases: उपजिल्‍हाधिकारी गणेश बर्वे यांनी आज कुटबण जेटीवर मच्‍छीमार खात्‍याचे अधिकारी आणि बोटमालकांची एक बैठक घेतली

गोमन्तक डिजिटल टीम

Cutbona Mobor

कुटबण जेटीवर झालेला कॉलराचा फैलाव पिण्‍याच्‍या पाण्‍यामुळे झाला आहे का, हे शोधून काढण्‍यासाठी या जेटीवर ज्‍या बोअरवेल आहेत, त्‍यां‍तील पाण्‍याची तपासणी करण्‍याचा निर्णय आज झालेल्‍या बैठकीत घेण्‍यात आला. प्रत्‍येक ट्रॉलरवर दोन शौचालये उभारण्‍य‍ाची सूचना मच्‍छीमार खात्‍याच्‍या संचालक यशस्‍विनी पी. यांनी यावेळी ट्रॉलरमालकांना केली.

दक्षिण गोव्‍याचे उपजिल्‍हाधिकारी गणेश बर्वे यांनी आज कुटबण जेटीवर मच्‍छीमार खात्‍याचे अधिकारी आणि बोटमालकांची एक बैठक घेतली. तीत वेगवेगळ्‍या विषयांवर चर्चा करण्‍यात आली. जेटीवर स्‍वच्‍छता राखण्‍यासाठी तेथे भंगार अवस्‍थेत असलेल्‍या बोटी हटविण्‍यात याव्‍यात, अशी सूचना बोटमालकांना करण्‍यात आली, अशी माहिती मच्‍छीमार खात्‍याचे सचिव ई. वलावन यांनी दिली.

कॉलराबाधितांची संख्‍या १८७ वर

कुटबण आणि मोबोर या दोन्‍ही मच्‍छीमारी जेटींवरील कॉलराबाधित रुग्‍णांची संख्‍या १८७ वर पोहोचली आहे. कालपर्यंत ती १८३ होती. आज आणखी ४ रुग्‍ण सापडले, अशी माहिती साथीच्‍या रोगनिवारक विभागाचे प्रमुख डॉ. उत्‍कर्ष बेतोडकर यांनी दिली. २ रुग्‍णांना ट्रॉलरवर असताना जुलाब व उलट्या सुरू झाल्‍या होत्‍या. आज किनाऱ्यावर पोहोचल्‍यावर लगेच त्‍यांना इस्‍पितळात हलविण्‍यात आले. सध्‍या ६ रुग्‍णांवर गोमेकॉत, दोघांवर दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात तर २० रुग्‍णांवर जेटीवरच उपचार सुरू आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

Camurlim Illegal Construction: 'ते' बांधकाम बेकायदाच! हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; कामुर्लीतील बांधकाम पाडण्याचे आदेश

Goa Mining: आता डंप हाताळणी 'सावधानतेने'! डीपीआर आवश्यक; कोट्यवधींची बँक हमीही द्यावी लागणार

Goa Police: तीन पोलिस निलंबित, तर दोघांवर शिस्तभंग; गोळीबार, एडबर्ग मारहाण प्रकरणी कारवाई

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

SCROLL FOR NEXT