Cutbona Mobor Jetty TGA
गोवा

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

Cutbona Cholera Cases: स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता किंवा कुठल्याही बैठकीला न बोलावण्याचे धोरण सरकारले अवलंबले आहे का? असा सिल्वांचा प्रश्न

गोमन्तक डिजिटल टीम

MLA Cruz Silva

सासष्टी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटबण जेटीच्या पाहणीच्या वेळी स्थानिक आमदारांना विश्र्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने या जेटीवरील सर्व समस्या सोडविल्या जातील असे स्पष्ट केले असताना सुद्धा त्यानंतर स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता किंवा कुठल्याही बैठकीला न बोलावण्याचे धोरण सरकारले अवलंबले आहे का? असा प्रश्न वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतर कुटबण जेटीची दोनदा पाहणी झाली. मत्स्योद्योग मंत्र्यांनी मडगावात बैठक बोलावली. मात्र स्थानिक आमदार म्हणून आपल्याला बोलावण्यात आले नसल्याचे क्रुझ सिल्वा यांनी सांगितले.

गेल्या कित्येक वर्षांपासून या जेटीवर अऩेक समस्या होत्या. मात्र, कुणीही त्याकडे जातीने लक्ष दिले नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतर प्रशासनावर दबाव आला व आता कुटबण जेटीवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू झाले. मात्र, सरकार आपल्यावरील जबाबदारी कमी करून बोट मालक तसेच पंचायतींवर ढकलत असल्याचेही सिल्वा यांनी सांगितले. आपल्या मतदारसंघात येतात व आपल्यालाच बोलावले जात नाही ही कसली प्रथा, असाही सवाल सिल्वा यांनी केला. आपण ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यानी सांगितले.

व्हेंझी यांची मंत्री सिक्वेरांवर टीका

दरम्यान, बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी मोबोर जेटी संदर्भात पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करुन टीका केली. येथील समस्या सोडविण्याची ताकद पर्यावरण मंत्र्यांकडे नसल्याने ते आपल्याला आव्हान देत आहेत. जो पर्यंत आलेक्स सिक्वेरा पर्यावरण मंत्री आहेत, तो पर्यंत गोव्याचे पर्यावरण सुरक्षित राहु शकणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.मोबोर जेटी संदर्भात विचारलेल्या प्रश्र्नाला मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले होते की, ती जबाबदारी स्वतः बाणावलीच्या आमदाराने घेतली आहे व त्याने तेथील सर्व समस्या सोडविण्यासाठी आपल्या शुभेच्छा त्यांना आहेत, असेही म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

SCROLL FOR NEXT