गोवा

Dabolim विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांचा प्रवाशांना त्रास; NGO चे आयुक्तांना निवेदन

निज गोयकार फौज या बिगर सरकारी संस्थेचे कस्टम आयुक्त व्ही सुंदरराजन यांना भेट निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) कस्टम अधिकारी प्रवाशांना नाहक त्रास देत आहेत. याप्रकरणी वास्को येथील निज गोयकार फौज या बिगर सरकारी संस्थेने (NGO) कस्टम मुख्यालय पणजी येथे आयुक्त व्ही सुंदरराजन यांना भेटून निवेदन दिले. तसेच, कस्टम कायदा 1962 (Custom Act 1962) नुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अशा कस्टम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

दाबोळी विमानतळावर काम करणारे कस्टम अधिकारी लोकांना त्रास देत आहेत आणि प्रवाशांची फसवणूक करत आहेत. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशाकडून शरीरावर असलेल्या सोन्याच्या दागिन्यावर शुल्क आकारले जाते जे अनुज्ञेय आहेत. तसेच त्यांचा मोबाईल बंद केला जातो आणि कुटुंबातील सदस्यांना कॉल किंवा संपर्क करण्याची परवानगी देत नाही. प्रवाशांना केवळ विदेशी चलनातच शुल्क भरण्याची तंबी दिली जाते.

दरम्यान, निज गोयकार फौज या बिगर सरकारी संस्थेने कस्टम अधिकाऱ्याकडून प्रवाशांना होणाऱ्या नाहक त्रासामुळे पणजी येथे कस्टम आयुक्त व्ही सुंदरराजन यांची भेट घेऊन निवेदन भेटविले. यात शुल्क भारतात परकीय चलनात का भरावे लागते असा सवाल करताना यावरून सेंट्रल रिझर्व्ह बँकेच्या महसुलाची या कस्टम अधिकाऱ्याकडून फसवणूक झाल्याचे दिसून येते असे म्हटले आहे.

सरकारी महसूल ची फसवणूक केल्याबद्दल रिझर्व बँक मार्गदर्शक तत्वे आणि कस्टम एक्ट 1962 नुसार भ्रष्टाचार करणाऱ्या आणि त्यांचे कर्तव्य न बजावणाऱ्या अशा कस्टम अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निज गोयकार फौज या बिगर सरकारी संस्थेने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT