post offices in goa Dainik Gomantak
गोवा

Ponda Post Office Chaos: 'सीएम साहेब' आता तुम्हीच लक्ष घाला! 'पत्रं' वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय

Ponda Post Office: फोंडा पोस्ट ऑफिसात सध्या अनागोंदी कारभाराचे प्रात्यक्षिक बघायला मिळत असून त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागत आहे.

Sameer Panditrao

Ponda Post Office Service Problem

फोंडा: फोंडा पोस्ट ऑफिसात सध्या अनागोंदी कारभाराचे प्रात्यक्षिक बघायला मिळत असून त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. टपालातून पत्रे पाठविण्याची प्रथा सध्या कालबाह्य होत चालली असली तरी अजूनही सरकारी कार्यालयातील काही महत्त्वाचे दस्तऐवज टपालानेच पाठवले जातात.

पण पोस्टमनचा कामचुकारपणामुळे ही पत्रे रजिस्टर्ड असूनही ती संबंधिताला देण्याऐवजी ती परत पाठवली जातात असे दिसून आले आहे. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान व्हायला लागले आहे. याबाबतीत असाच एक अनुभव एका ग्राहकाला आला आहे.

या ग्राहकाला वाहतूक कार्यालयातून त्याचे वाहन रजिस्टर्ड केल्याचा परवाना पाठवण्यात आला होता. पण संबंधित पोस्टमानाने पत्ता मिळत नाही ही सबब निर्देशित करून ते टपाल परत पाठवले. याबाबतीत त्या ग्राहकाने पोस्ट मास्तरशी व संबंधित पोस्टमनशी संपर्क साधल्यावर अशा प्रकारचे पार्सल आपल्याकडे आलेच नसल्याचे उत्तर त्याला मिळाले.

वास्तविक पोस्टल कायद्याप्रमाणे एखादा पत्ता जर पोस्टमनाच्या मताप्रमाणे अपुरा असला तर त्या ग्राहकाच्या फोन नंबरवर मेसेज पाठवायचा असतो. पण इथे मेसेज पाठवण्याची कोणतीही तसदी पोस्ट मास्तर वा पोस्टमन घेत नसल्याचे फोंड्यातील अनेक ग्राहकांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

गोमंतकीय पोस्टमनाना डच्चू देऊन त्यांच्या जागी बिगर गोमंतकीयांची वर्णी लावल्यापासून अशा प्रकारात वाढ झाली आहे, असे अनेक ग्राहकांनी सांगितले. याबाबतीत गोवा राज्याच्या प्रधान पोस्टमास्तरकडे तक्रार करण्याचा मनोदय अनेक ग्राहकांनी व्यक्त केला आहे. जरी पोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असली तरी त्यांचे कार्यालय गोवा राज्यात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे,अशी मागणीही या ग्राहकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT