Pritesh Gaokar, Ritesh Naik, Curti  Dainik Gomantak
गोवा

Curti ZP Election: 'रवी नाईक' यांचे कार्य पुढे नेणार! रितेश यांचे प्रतिपादन; कुर्टीत भाजपचे प्रितेश गावकर यांचा प्रचार सुरू

Goa ZP Election: कुर्टी जिल्हा पंचायतीच्या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रितेश गावकर यांचा प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी श्री सातेरी देवीला श्रीफळ ठेवून तसेच गाऱ्हाणे घालून करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: कुर्टी जिल्हा पंचायतीच्या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रितेश गावकर यांचा प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी श्री सातेरी देवीला श्रीफळ ठेवून तसेच गाऱ्हाणे घालून करण्यात आला.

यावेळी भाजपचे फोंडा मंडळ अध्यक्ष हरेश नाईक, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, नगरसेवक रितेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, माजी नगराध्यक्ष आनंद नाईक तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हरेश नाईक म्हणाले की, प्रितेश गावकर यांना सर्व थरातून पाठिंबा मिळत असून ते निश्‍चितच मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील. तर, रितेश नाईक म्हणाले, फोंड्याचे दिवंगत आमदार रवी नाईक यांनी फोंडा तसेच राज्यात अनेक विकासकामे केली आहेत.

लोकांना चांगले ते देण्यासाठी ते कार्यरत राहिले. त्यांचे कार्य पुढे नेण्यात येणार असून प्रितेश गावकर हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील. विश्‍वनाथ दळवी यांनीही प्रितेश गावकर हे भाजपाचे उमेदवार असून कुर्टी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्‍याने निवडून येतील असा विश्‍‍वास व्‍यक्त केला. राज्यात भाजप-मगो युतीचे सरकार आहे. त्‍यामुळे युतीच्या उमेदवाराविरोधात कार्य करणाऱ्यांना पक्षाने हटवावे.

फोंड्यात भाजप विरुद्ध मगो!

फोंड्यातील कुर्टी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध मगो असे चित्र निर्माण झाले आहे. या मतदारसंघात विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी या मगोच्या आहेत, मात्र हा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला. वास्तविक ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आला, त्यालाच पहिली संधी दिली जाते. पण त्‍यांना डावलून भाजपच्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच आता मगोचे समर्थक असलेले केतन भाटीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला अपक्ष उमेदवार या मतदारसंघात उतरवला आहे. परिणामी मते फुटण्‍याची शक्‍यता व्‍यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT