Curfew in Goa
Curfew in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Curfew: संचारबंदीत पुन्हा आठवडाभर वाढ

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) कोरोनाची (Covid-19) स्थिती नियंत्रणात येत असली तरी तिसऱ्या लाटेची सावधगिरी बागळगण्यासाठी सरकार ‘कर्फ्यू’ (Goa Curfew) उठवण्यास तूर्त राजी नाही. संचारबंदी उठविल्यास लोकांवर निर्बंध राहणार नाहीत व नियंत्रणात आलेला हा आजार पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकार वारंवार कर्फ्यूत वाढ करण्याबरोबरच हळुहळू निर्बंध शिथिल करीत आहे. कर्फ्यू आणखी एक आठवडा म्हणजे 16 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यात इतर कोणताच बदल करण्यात आला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिली. (Curfew has extended again till August 16 in Goa)

स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल बंदच

राज्यातील कसिनो, सभागृहे, कम्युनिटी हॉल किंवा तत्सम जागा, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, करमणूक उद्याने, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल्समधील मनोरंजन झोन खुले करण्‍यास परवानगी देण्‍यात आलेली नाही.

राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाखाली आली असली, तरी मृत्यूचे प्रमाण काही अंशी सुरूच असल्याने सरकारने एक आठवडाभर म्हणजे 16 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली. मात्र अजूनही राज्यातील कॅसिनो, सभागृह, कम्युनिटी हॉल किंवा तत्सम जागा, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, करमणूक उद्याने, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल्समधील मनोरंजन झोन असलेल्या व्यावसायिकांना या आदेशात सूट देण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

SCROLL FOR NEXT