Goa Temple Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Temple Theft: चोरांच्या नजरेतून मंदिरही सुटेना; कामराळ येथील बाबा मंदिरातील दानपेटीवर डल्ला, 50 हजारांची रोकड लंपास

Temple Theft: राज्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, आता चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवला आहे.

Sameer Amunekar

कुडचडे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, आता चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवला आहे. कुडचडे येथील कामराळ भागातील 'बाबा मंदिरा'त मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिराचे दरवाजे तोडून दानपेटीतील हजारो रुपयांची रोकड लंपास केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २ फेब्रुवारी रोजी पहाटे १२:२३ च्या सुमारास घडली. चोरट्याने मंदिराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा शिताफीने तोडून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरट्याने अत्यंत नियोजनबद्धरीत्या ही चोरी केल्याचे दिसून येत आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने थेट दानपेटीला लक्ष्य केले आणि त्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

५० हजारांची रोकड लंपास

मंदिराच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, दानपेटीमध्ये भाविकांनी अर्पण केलेली सुमारे ५०,००० रुपयांची रोकड होती. सकाळी जेव्हा मंदिराचे पुजारी आणि कर्मचारी आले, तेव्हा त्यांना मागील दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळला.

दानपेटी उघडी असल्याचे आणि त्यातील सर्व पैसे गायब असल्याचे पाहताच त्यांनी तात्काळ कुडचडे पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. ही रक्कम उत्सवाच्या कामासाठी किंवा मंदिराच्या देखभालीसाठी वापरली जाणार होती, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

कुडचडे पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच कुडचडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT