Curchorem Municipal council Chairperson Vishwas Sawant Desai resigns  
गोवा

विश्वास सावंत देसाई यांचा अखेर कुडचडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा

मुदत संपूनही राजीनामा न देता मंत्री निलेश काब्राल यांच्याशी घेतली होती संघर्षाची भूमिका

सुशांत कुंकळयेकर

केपे : कुडचडे काकोडा पालिकेचे नगराध्यक्ष विश्वास सावंत देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठरवून दिलेली एक वर्षाची मुदत संपूनही आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा न देता मंत्री निलेश काब्राल यांच्याशी संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर त्यांनी राजीनामा दिल्याने पदावरून पेटलेल्या राजकारणावर अखेर पडदा पडला आहे.

विश्वास सावंत देसाई यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिल्याने आता या पदासाठी जास्मिन ब्रागंझा यांची वाट मोकळी झाली आहे. विश्वास सावंत देसाई याना एक वर्षाचा दिलेला कालावधी उलटून सुद्धा त्यांनी नगराध्यक्षपद सोडण्यास नकार दिला होता. यावरून पालिकेत अंतर्गत राजकारण बरेच पेटले होते. देसाई यांना सत्ताधारी नगरसेवकासक विरोधी नगरसेवकांनीसुद्धा पाठिंबा देऊन ब्रागंझा यांना नगराध्यक्ष करण्यास सरळ नकार दिल्याने नगराध्यक्ष पदासाठी देसाई यांची स्थिती भक्कम बनली होती. पण गेल्या काही दिवसापासून अचानक देसाई यांनी मवाळ धोरण स्वीकारल्याने ब्रागंझा यांची या पदावर वर्णी लागणार असल्याचे चित्र दिसत होते.

नगराध्यक्ष विश्वास सावंत देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने बऱ्याच नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनीच ब्रागंझा यांचे नगराध्यक्ष पदासाठी सूचित केले होते. आता हे पद रिक्त झाल्याने ब्रागंझा यांची वाट मोकळी झाली असून पुढील नगराध्यक्ष म्हणून ब्रागंझा त्या खुर्चीवर विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT