Curchorem Market Fire Dainik Gomantak
गोवा

Curchorem Market Fire: कुडचडेतील फळ, फूल मार्केट जळून झाले खाक; विक्रेत्यांचे 5 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा

Curchorem Market: कुडचडे येथील सुडा मार्केटला सोमवारी पहाटे ३ वा.च्या सुमारास फुल व फळ विक्रेत्यांच्या शेडला आग लागून सुमारे बावीस विक्रेत्यांचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे: कुडचडे येथील सुडा मार्केटला सोमवारी पहाटे ३ वा.च्या सुमारास फुल व फळ विक्रेत्यांच्या शेडला आग लागून सुमारे बावीस विक्रेत्यांचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. कुडचडे अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने शेजारी अन्य दुकाने आगीतून वाचवण्यास त्यांना यश आले.

दिवाळी असल्याने विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात फळ व फुलांचा साठा करून ठेवला होता. प्लास्टिक क्रेट तसेच त्यावर घातलेले प्लास्टिक आवरणामुळे आग भडकली. त्यामुळे विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, सोमवारी सकाळी समाजसेवक रोहन गावस देसाई, नगरसेवक बाळकृष्ण होडरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जळलेल्या शेडची पाहणी केली. यावेळी रोहन गावस देसाई यांनी ज्या विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना आपण काहीप्रमाणात आर्थिक मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

याठिकाणी आपला व्यवसाय करणारे लोक गरीब असून दिवाळीच्या दिवशी त्यांच्यावर संकट ओढवले ही एक अत्यंत वाईट गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळकृष्ण होडरकर यांनी या विक्रेत्यासाठी दुसऱ्या जागेवर स्थलांतर करण्यासाठी आपण पालिका बैठकीत प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले. ही शेड पार्किंगच्या जागी स्थलांतरित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहन गावस देसाईंकडून विक्रेत्यांना आर्थिक मदत

सदर रात्री आग लागल्याच्या ठिकाणी अज्ञात व्यक्ती सीसीटीव्ही मध्ये दिसून येत असल्याने ही आग मुद्दामहून लावली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिलेल्या आश्वासन प्रमाणे रोहन गावस देसाई यांनी मंगळवारी सकाळी नुकसान झालेल्या पंधरा विक्रेत्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांची मदत दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT