Goa Garbage Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Garbage Issue: कचरा कोंडीचे संकट घोंगावू लागले; सोनसडोतील कचऱ्याला काकोड्यातून विरोध

साळगाववासीयांचाही आक्षेप

दैनिक गोमन्तक

राज्यावर कचरा कोंडीचे संकट घोंगावू लागले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोनसडो येथील कचरा काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेण्यास कुडचडे-काकोडा पालिकेने विरोध दर्शविला आहे.

न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशानुसार सोनसडोतील कचरा साळगाव येथील प्रकल्पात नेण्यात येत होता. आता साळगाव येथील प्रकल्पात फोंडा व मुरगावातील कचरा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे कचरा प्रश्नाचा फुटबॉल होण्याची शक्यता आहे.

आमच्याकडे दुसऱ्याचा कचरा नको, अशी भूमिका प्रत्येकजण घेऊ लागला आहे. यामुळे गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचा निर्णय घेण्यात कस लागणार आहे.

या प्रकरणी उच्च न्यायालयातही हस्तक्षेप याचिका कुडचडे पालिका दाखल करणार असल्याने हा विषय चिघळण्याची शक्यता आहे.

दक्षिणेतील कचरा साळगावात कशाला?

कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले, साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्प हा फक्त उत्तरेतील किनारी भागांतील पंचायतींसाठी आहे. काही दिवसांत पर्यटन हंगामास सुरवात होईल.

त्यामुळे किनारी भागांतील हॉटेल उद्योग सुरू होऊन कचरा निर्मिती वाढेल. त्यामुळे प्रकल्पात जास्त कचरा येईल. त्यात दक्षिण गोव्यातील अतिरिक्त कचऱ्यामुळे साळगाव प्रकल्पावर ताण पडेल.

मुळात दक्षिणेतील कचरा साळगावमध्ये कशाला? दक्षिणेतील कचरा संकलन योग्य पद्धतीने करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT