Tanvi Vasta Case Dainik Gomantak
गोवा

Tanvi Vasta Case: कुडचडे बँक घोटाळा प्रकरणाला आता 'मनी लाँडरिंग'चाही 'कोन', 'ईडी'कडून तन्‍वी वस्‍तची चौकशी होण्‍याची शक्‍यता

Curchorem bank scam: तन्‍वी वस्‍त आणि आनंद जाधव या दोघांच्‍या संगनमताने झालेले आणि संपूर्ण राज्यात खळबळ माजविलेल्या कुडचडे बँक घाेटाळा प्रकरणात मनी लाँडरींगचाही कोन असण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Sameer Amunekar

मडगाव: फॅशन मॉडेल तन्‍वी वस्‍त आणि बँक व्‍यवस्‍थापक आनंद जाधव या दोघांच्‍या संगनमताने झालेले आणि संपूर्ण राज्यात खळबळ माजविलेल्या कुडचडे बँक घाेटाळा प्रकरणात मनी लाँडरींगचाही कोन असण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

त्यामुळेच या प्रकरणाची सक्‍त वसुली (ईडी) खात्‍याने चौकशी सुरु केली आहे. या घोटाळ्‍यात सुमारे १५ कोटींची रुपयांची अफरातफर झाली. मात्र हे पैसे नेमके कुठे गेले याचा तपास कुडचडे पोलिसांना लावता आला नाही.

गोव्‍यात तसेच गोव्‍याबाहेर होणाऱ्या अनेक ‘ब्‍युटी पेजंट’मध्‍ये भाग घेतलेल्‍या तन्‍वी वस्‍त हिने कुडचडे आणि जवळपासच्‍या भागातील अनेकांना बँकेत असलेल्‍या त्‍यांच्‍या ठेवींचे नुतनीकरण करण्‍यास मदत करण्‍याच्‍या बहाण्‍याने लोकांच्‍या बँक खात्‍यातील पैसे स्‍वत:च्‍या

खात्‍यात वळवले होते. या प्रकरणात तिला कुडचडेच्‍या सेंट्रल बँकचे व्‍यवस्‍थापक आनंद जाधव यांनीही पाठिंबा दिला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो पैशांचा अपहार केला गेला ते पैसे कुणाकडे वळते झाले याचा तपास सध्‍या ईडी करत आहे. त्‍यामुळे ईडीकडून या दोघांची पुन्‍हा चौकशी होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

१६ वेगवेगळी प्रकरणे नोंद

तन्‍वी वस्‍त आणि आनंद जाधव या दोघांच्‍या विरोधात कुडचडे पोलिसात सुमारे १५ वेगवेगळी प्रकरणे नोंद झाली आहेत. त्‍यापैकी चार प्रकरणांचा तपास पूर्ण झाल्‍याने पोलिसांनी या प्रकरणी न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Recruitment Controversy: मनसे आयोजित नोकर भरतीवरुन गोव्यात राजकीय वादंग; फोंड्यात नोकरीसाठी कुडाळमध्ये मुलाखती का? आमदार सरदेसाईंचा भाजप सरकारला सवाल

सत्तरीत विचित्र घटना! भर बाजारात सापडली हाडं,परिसरात खळबळ; नेमकं काय घडलं? वाचा

Viral Video: चोराला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, बहाद्दर महिलेचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी अवाक; म्हणाले, 'ही तर ब्रूस लीची आजी...'

Goa Politics: काँग्रेसहून आलेले आठ आमदार 'डेंजर झोन'मध्ये; दामूंच्या 27 जागांचा संकल्प भाजपसाठी थट्टेचा विषय ठरणार?

BITS Pilani विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; उलटीत सापडले तीन प्रकारचे ड्रग्ज, घटनेचे गूढ वाढले

SCROLL FOR NEXT