Curb illegal activities on shores of Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या किनाऱ्यावरील अवैध कृत्यांवर आळा घाला

कोलवा, गंडावली, वानेली, सेर्नाभाटी समुद्रकिनाऱ्यावर फेरीवाल्यांद्वारे बेकायदेशीर कृत्ये

दैनिक गोमन्तक

सासष्टी: सासष्टी तालुक्यातील किनारपट्टी भागातील पंचयतींनी समुद्र किनाऱ्यावर फेरीवाले, छायाचित्रकार आणि टॅटू कलाकारांच्या बेकायदेशीर कामांची माहिती देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पर्यटन खात्याकडे केली होती. या तक्रारीवरून पर्यटन खात्याचे साहाय्यक संचालक रॉडलिन मस्करेन्हास यांनी कोलवा पोलिस ठाण्यात निवेदन सादर करून या बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस तैनात करण्याची मागणी केली आहे.

कोलवा, गंडावली, वानेली, सेर्नाभाटी समुद्रकिनाऱ्यावर फेरीवाल्यांद्वारे बेकायदेशीर कृत्ये करण्यात येत असल्यामुळे सर्व समुद्रकिनाऱ्यावर आयआरबी पोलिस कर्मचारी तैनात करावे, अशी मागणी पंचायतीकडून करण्यात आली होती. दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर कडक नजर ठेवणे आवश्यक आहे, असे मास्कारेन्हास यांनी निवेदनात स्पष्ट आहे.

पोलिसांची कमतरता असल्याचे स्पष्टीकरण!

पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर कृत्ये वाढली आहेत. समुद्रकिनाऱ्यावर अनेक फेरीवाले दिसतात. याशिवाय, आता अनेक छायाचित्रकार आणि टॅटू कलाकार देखील पाहू शकतो जे समुद्रकिनाऱ्यावर फिरत आहेत आणि पर्यटकांना त्रास देत आहेत. यासंबंधी पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. परंतु, पोलीस गस्त घालण्यासाठी पोलिसांची कमतरता भासत असल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण मिळत आहे, पंच सदस्य अँथनी फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT