Goa Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Liquor Case: 2 महिने उभा होता संशयास्पद ट्रक, आत होती 57 लाखांची दारू; मुख्य संशयित अजूनही गायब

Cuncolim Truck Liquor Seized: ४५८ दारूचे खोक्यांत ५७ लाख १५ हजार ८४० रुपये किमतीची दारू सापडली होती. ‘एव्हरग्रीन रिजर्व व्हिस्की’चे लेबल या दारूच्या बाटल्यांवर होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: जप्त केलेल्या ५७ लाख रुपये किमतीच्या दारू प्रकरणी  कुंकळ्ळी पोलिसांना ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेला मुख्य संशयित रमेश कुमार प्रजापत याचा ठावठिकाणा अजूनही लागू शकला नसून त्याचे शेवटचे लोकेशन कर्नाटकातील बंगळुरू येथे पोलिसांना सापडले आहे.

तेथील पोलिसांना  याबाबत सतर्क केले आहे. संशयिताचा सध्या कसून शोध चालू असून तो पोलिसांच्या हाती लागल्यास या दारू तस्करीचा पर्दाफाश होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी कुंकळ्ळी पोलिसांनी औद्योगिक वसाहतीतील पॉवर हाउसजवळ कर्नाटक राज्य नोंदणीकृत एक ट्रक जप्त केला होता.

यात ४५८ दारूचे खोक्यांत ५७ लाख १५ हजार ८४० रुपये किमतीची  दारू सापडली होती. ‘एव्हरग्रीन रिजर्व व्हिस्की’चे लेबल या दारूच्या बाटल्यांवर होते. दारू तस्करीचा हा प्रकार असून त्याचे कनेक्शन  दारू माफियांशी आहे. आंतरराज्य टोळी यात  गुंतली  असून  पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे संबंध उघड झाले आहेत.

रमेश व अन्य अज्ञातांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधन भोसले पुढील तपास करीत आहेत.  कुंकळ्ळी पोलिसांनी तपासकामाबाबत अत्यंत गोपनियता बाळगली आहे. अधिक माहिती देणे पोलिस टाळत आहेत.  पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश याचा पत्ता  बेळगाव येथील असला  तरी तो तिथे राहत नसल्याचे आढळून आले आहे.

ट्रक घेतला होता लीजवर

कर्नाटकातील तुमकुर येथील महालिंगा बी. सी. यांच्या मालकीचा हा कर्नाटक राज्य नोंदणीकृत ट्रक आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी तो रमेश कुमार प्रजापत याला लीजवर दिला होता. त्याचे पैसेही येणे बाकी होते. गेले दोन महिने प्रजापत हा महालिंगा याचा कॉलही घेत नव्हता. शेवटी त्यांनी जीपीएस ट्रॅकरचा आधार घेतला असता त्यांना आपला ट्रक कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीत असल्याचे आढळून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT