Fuel Truck Explodes: पेट्रोलने भरलेला टँकर रस्त्यावर उलटला, इंधन गोळा करताना झाला स्फोट; 31 जणांचा जागीच मृत्यू! VIDEO

Nigeria Fuel Truck Explodes: पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भीषण अपघात झाला आहे.
Nigeria Fuel Truck Explodes
Fuel Truck ExplodesDainik Gomantak
Published on
Updated on

Nigeria Fuel Truck Explodes Video: पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भीषण अपघात झाला. पेट्रोलने भरलेल्या एका टँकरमध्ये भीषण स्फोट झाल्याने 31 लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर 17 जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी या दुर्घटनेची माहिती दिली. पोलीस प्रवक्ते वसीउ आबिदीन यांनी एका निवेदनात सांगितले की, नायजर राज्याच्या बिदा भागात हा अपघात झाला. पेट्रोलने भरलेला टँकर रस्त्यावर उलटला, आणि त्यानंतर लगेचच टँकरमध्ये मोठा स्फोट झाला.

इंधन गोळा करण्यासाठी जमलेल्या लोकांचा बळी

दरम्यान, ही दुर्घटना इतकी भीषण यासाठी ठरली, कारण टँकर उलटल्यानंतर त्यातून पेट्रोल बाहेर पडू लागले. त्यावेळी स्थानिक रहिवासी हे पसरलेले पेट्रोल गोळा करण्यासाठी घटनास्थळाकडे धावले. पेट्रोल गोळा करण्याच्या प्रयत्नात असतानाच टँकरचा स्फोट झाला आणि या दुर्घटनेत निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. वसीउ आबिदीन यांनी सांगितले की, स्फोटात 17 लोक जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Nigeria Fuel Truck Explodes
India America Relations: ट्रम्प यांनी 4 वेळा फोन केला, पण मोदींनी घेतला नाही? जर्मन मासिकाचा मोठा दावा

नायजेरियात अपघातांचे प्रमाण वाढले

नायजर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अवजड ट्रक आणि टँकरशी संबंधित अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. येथील रस्त्यांची दुरवस्था आणि रेल्वे नेटवर्कचा अभाव यासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. नायजर राज्य हे उत्तर आणि दक्षिण नायजेरिया दरम्यान मालाची वाहतूक करण्यासाठी एक प्रमुख केंद्र आहे.

नायजर राज्याचे गव्हर्नर उमरू बागो यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, "धोका दिसत असूनही लोक उलटलेल्या टँकरमधून पेट्रोल गोळा करण्यासाठी धावले, ही गोष्ट खूपच निराशाजनक आहे. ही लोकांवर आणि राज्य सरकारवर आलेली आणखी एक वेदनादायक घटना आहे."

Nigeria Fuel Truck Explodes
America Accident: अमेरिकेत भीषण अपघात! यू-टर्न घेणाऱ्या ट्रकला धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भारतीय चालकावर हत्त्येचा आरोप VIDEO

यापूर्वीही मोठे अपघात झाले

नायजेरियामध्ये यापूर्वीही मोठे अपघात घडले आहेत. याच वर्षी जून महिन्यात कानो राज्यात एक भीषण रस्ते अपघात झाला होता. एका पुलावरुन बस खाली कोसळली होती, ज्यात कमीतकमी 22 ॲथलीट्सचा मृत्यू झाला होता आणि अनेक प्रवासी जखमी झाले होते. तेव्हाही रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. आता पुन्हा पेट्रोलने भरलेल्या टँकरच्या स्फोटामुळे लोकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. सरकार यावर कोणती ठोस पाऊले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com