Margao Court Order Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सोशल मीडियावर केली मैत्री, 90 लाखांना घातला गंडा, युवतीवर केला लैंगिक अत्याचार; संशयिताला सशर्त जामीन

Goa Crime News: युवतीवर बलात्कार केल्‍याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केलेला मेल्सन कुतिन्हो याला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

Sameer Panditrao

मडगाव: युवतीवर बलात्कार केल्‍याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केलेला मेल्सन कुतिन्हो याला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. ५० हजार रुपये व एक हमीदार तसेच न्यालयालाच्या पूर्व परवानगीशिवाय राज्याबाहेर न जाणे आदी अटी जामीन मंजूर करताना घातल्या आहेत. न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयाने हा निवडा दिला.

सोशल मीडीयावर मैत्री करून एका युवतीला प्रेमपाशात ओढवून नंतर तिच्यावर अत्‍याचार केल्या प्रकरणात मेल्सनला पोलिसांनी अटक केली होती. मागाहून त्याची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

आजारी असल्‍याचे सांगून तसेच तपासणीसचा बहाणा करून मेल्सनने त्या युवतीकडून रोकड व सुवर्णलंकारही घेतले होते. त्‍याची किंमत तब्बल ९० लाखांपेक्षा जास्‍त होती. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने यासंबंधी पोलिसात तक्रार नोंदविली होती.

संशयितावर पोलिसांनी भारतीय न्यायदंड संहितेच्या ६४ (१) , ३५१ (४ ), ३१८ (४) कलमाखाली गुन्हा नोंद​ केला होता. पीडित युवतीशी त्याने सोशल मीडियावरून फ़्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवून नंतर मैत्री केली होती.

विवाहाचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. नंतर आपल्या घरी बोलावून तो पीडितेवर बलात्कार करत असे. चालू वर्षाच्या ९ एप्रिल ते १८ ऑगस्ट या काळात त्‍याने तिच्‍यावर वारंवार अत्‍याचार केला होता. पण नंतर तो आपल्‍याला फसवत असल्‍याचे त्‍या युवतीच्‍या लक्षात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT