Cuncolim Palika  Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Municipality : कुंकळ्ळी नगराध्यक्ष अविश्वास ठरावावरून राजकारण तापले; आज होणार चर्चा

‘बैठक रद्द’ची नोटीस चार तासांत मागे

दैनिक गोमन्तक

भाजपचे पाच नगरसेवक दिल्लीत एका दौऱ्यावर जायचे आहेत, अशी सबब पुढे करून रद्द करण्यात आलेली कुंकळ्ळी नगराध्यक्ष अविश्वास ठरावावरील बैठक सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी आवाज उठवल्यावर नगरपालिका प्रशासन संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी अवघ्या चार तासांत मागे घेतली.परिणामी उद्या मंगळवारी पूर्व नियोजनानुसार बैठक होणार हे निश्‍चित झाले आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या गटातील सात नगरसेवकांनी एका अपक्ष नगरसेवकाच्या सहयोगाने आपल्याच गटाचे नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे. चौदा पैकी आठ नगरसेवकांनी ठरावाच्या समर्थनात सह्या केल्या आहेत. उद्या त्यावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

विरोधी भाजप गटाचे नगरसेवक विदेश देसाई, पोलिटा कार्नेरो, विशाल शाबु देसाई, रूपा गावकर आणि राहुल देसाई हे दिल्ली दौऱ्यावर जात असल्याचे कारण पुढे करून सोमवारी सकाळी पिळर्णकर यांनी ही बैठक रद्द केल्याची नोटीस जारी केली. मात्र, सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी याला तीव्र आक्षेप घेतल्यावर अवघ्या चार तासांत पिळर्णकर यांनी आपला निर्णय बदलून ही बैठक पूर्वनिश्‍चितीनुसार होईल, असे सुचविणारी नवीन नोटीस जारी केली.

सरांची खुर्ची जाणार !

लक्ष्मण नाईक यांना वाचविण्यासाठी विरोधकांनी कट रचल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. मात्र, उद्याच्या अविश्वास ठरावावरील चर्चेत लक्ष्मण सरांची खुर्ची जाणार, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

वर्ष होऊनही पद न सोडल्याने ‘अविश्‍वास’

कुंकळ्ळी पालिकेवर युरी आलेमाव यांचे समर्थन लाभलेले मंडळ असून सत्ताधारी गटानेच नगराध्यक्ष नाईक यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला असून दिलेला एका वर्षाचा कालावधी उलटूनही त्यांनी पद सोडले नाही, म्हणून त्यांच्या विरोधात हा ठराव आणला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT