Goa Crime Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: बंद खोलीत आढळला उत्तर प्रदेशच्या तरुणाचा मृतदेह, कुंकळ्ळीत उडाली खळबळ; पोलिसांनी नाकारला घातपाताचा संशय

Kottamoll Cuncolim Death Case: कुंकळ्ळी येथे एका घरात ३५ वर्षीय इसम मृत अवस्थेत सापडला. मोहम्मद आतिक हुसेन असे मयताचे नाव असून तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: कोट्टामळ, कुंकळ्ळी येथे एका घरात ३५ वर्षीय इसम मृत अवस्थेत सापडला. मोहम्मद आतिक हुसेन असे मयताचे नाव असून तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील आहे. शवविच्छेदन अहवालानुसार फुफ्फुसातील रक्तवाहिनीत अडथळा हे मृत्यूचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी ही घटना अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवून घेतली आहे. उपनिरीक्षक किशोर वेळीप पुढील तपास करीत आहेत.

पोलिस चौकशीत असे निष्पन्न झाले की, २८ एप्रिल रोजी मोहम्मद याला तीव्र डोकेदुखी व उलट्यांचा त्रास झाल्याने बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी २९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याचा भाऊ मोहम्मद सिद्दीक खोलीवर आला असता दार आतून बंद असल्याचे दिसले. खिडकीतून पाहिले असता मोहम्मद आतिक निपचित पडलेला आढळला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून त्याला बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घातपाताचा संशय नाकारला असून, शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT