Cuncolim IDC Road Dainik Gomantak
गोवा

Cuncolim IDC Road: एक महिन्यापूर्वी केली दुरूस्ती, कुंकळ्ळी IDC रस्ता पावसात झाला खड्डेमय

वाहतुकीसाठी देखील हा मार्ग धोकादायक झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

Cuncolim IDC Road: कुंकळ्ळी IDC रस्त्याची हॉटमिक्स आणि दुरूस्ती सहा जून 2023 रोजी करण्यात आली होती. मात्र, एक महिन्यानंतर या रस्त्याची दुरावस्था झाली असून, मार्ग खड्डेमय झाला आहे.

वाहतुकीसाठी देखील हा मार्ग धोकादायक झाल्याचे स्थानिकांनी म्हटले असून, मार्ग वाहतुकीसाठी बंद करून त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी केली आहे.

शंतनु देसाई यांनी याप्रकरणी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मागील महिन्यात 06 जून रोजी कुंकळ्ळी IDC रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र, 06 जुलै रोजी हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. याबाबत मी कुंकळ्ळीच्या फिल्ड मॅनेजर यांना हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक घोषित करण्याची मागणी केली आहे.

तसेच, या मार्गावरील वाहतूक वळविण्यात यावी अशीही मागणी केली आहे. देसाई यांनी मुख्यमंत्री सावंत आणि विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

देसाई यांनी फिल्ड मॅनेजर यांना लिहले पत्र

कुंकळ्ळी औद्योगिक इस्टेट मधील रस्ता दुरूस्तीच्या एक महिन्यात खराब झाला आहे. रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. रस्ता वाहतुकीसाठी योग्य नाही असे घोषित करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे.

तसेच, या मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळविण्यात यावी. तसेच, या ठिकाणी बॅरिकेड आणि सूचना फलक लावावेत अशीही मागणी देसाई यांनी पत्राद्वारे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT