Cuncolim IDC Ammonia Gas Leak Case Dainik Gomantak
गोवा

श्वास कोंडणाऱ्या 'त्या' घटनेचा हिशोब होणार! कुंकळ्ळी अमोनिया गळतीप्रकरणी सुनावणी सुरु होणार; औद्योगिक सुरक्षेशी खेळणाऱ्यांना दणका

Cuncolim IDC Ammonia Gas Leak Case: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील मेसर्स जोकन्स मेरिन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये घडलेल्या अमोनिया वायू गळतीप्रकरणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी वैशाली लोटलीकर यांनी लेनीन मथन आणि संतोष राजकिशोर महातो यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना १६ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.१५ वाजता सासष्टी तालुक्यातील कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील मेसर्स जोकन्स मेरिन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत अमोनिया पाइपलाइन रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू असताना, आरोपींनी (Accused) पाइपचे टोक पाण्याच्या कंटेनरमधून बाहेर काढले. यामुळे विषारी अमोनिया वायू थेट हवेत पसरला, ज्यामुळे परिसरात असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास झाला होता.

या प्रकरणात सरकारी वकील एस. नाईक यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. घटनेच्यावेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांच्याच सूचनेनुसार हे काम केले जात होते, ज्यामुळे ते या निष्काळजीपणाला पूर्णपणे जबाबदार आहेत, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, बचाव पक्षाचे वकील ए. प्रभुदेसाई यांनी असा दावा केला की, आरोपी त्यावेळी कामावर नव्हते आणि पंचनाम्यात किंवा साक्षीदारांच्या जबाबात त्यांचा या घटनेशी थेट संबंध जोडणारा कोणताही ठोस पुरावा नाही.

या प्रकरणात सरकारी वकील एस. नाईक यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. घटनेच्यावेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांच्याच सूचनेनुसार हे काम केले जात होते, ज्यामुळे ते या निष्काळजीपणाला पूर्णपणे जबाबदार आहेत, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, बचाव पक्षाचे वकील ए. प्रभुदेसाई यांनी असा दावा केला की, आरोपी त्यावेळी कामावर नव्हते आणि पंचनाम्यात किंवा साक्षीदारांच्या जबाबात त्यांचा या घटनेशी थेट संबंध जोडणारा कोणताही ठोस पुरावा नाही.

मात्र, उपलब्ध रेकॉर्ड आणि पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २८४ (विषारी पदार्थांच्या वापराबाबत निष्काळजीपणा) आणि ३३६ (इतरांच्या जीवितास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणे) अंतर्गत खटला चालवण्यासाठी पुरेसे आधार आहेत. या निर्णयामुळे औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नुवे घरफोडी प्रकरण! कुख्यात 'पारधी गँग'चा गुंड अर्जुन गायकवाडच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ; अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे उलगडणार?

Goa Tourists Manali Trip: मनालीत गोमंतकीय पर्यटकांची मृत्यूशी झुंज! 48 जणांची सुखरुप सुटका; 'श्रीपाद भाऊं’चा मायेचा आधार

Ponda Fish Market: अस्वच्छतेचा कळस! फोंडा मासळी मार्केटमध्ये दुर्गंधी अन् किड्यांचं साम्राज्य; अनागोंदी कारभारावर व्यापाऱ्यांचा संताप

Goa Drugs Case: तपासाची चक्रे फिरली अन् 'सुसान' जाळ्यात अडकली! वार्का ड्रग्ज प्रकरणाला 'आंतरराष्ट्रीय' वळण; अमेरिकन महिलेला गोव्यात बेड्या

Goa Night Club Fire: 'फायर अलार्म' वाजलाच नाही'! आर्थिक फायद्यासाठी लुथरा बंधूंचा लोकांच्या जीवाशी खेळ; सरकारी पक्षाचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT