Cuncoliem, Mardol shopkeeper attacked by robbers in the wee hours today Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: कुंकळ्ळ्ये, म्हार्दोळ परिसरात लुटीचा प्रयत्न फसला; चोरटे पसार

फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत काल बुधवारी रात्री तीन चोऱ्या झाल्या असून तिन्ही चोर्‍यामध्ये एकाच टोळक्याचा हात आहे का अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: आज पहाटे दोन चोरट्यांनी कुंकळ्ळ्ये, म्हार्दोळ येथे एका दुकानदारावर हल्ला केला. पहाटे 3 च्या सुमारास झालेल्या हल्ल्यात गुरुदास असे किराणा दुकान मालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांनी वापरलेल्या दुचाकी हल्ल्याच्या ठिकाणी फेकून घटनास्थळावरून पळ काढला.

(Cuncoliem, Mardol shopkeeper attacked by robbers in the wee hours today)

फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत काल बुधवारी रात्री तीन चोऱ्या झाल्या असून तिन्ही चोर्‍यामध्ये एकाच टोळक्याचा हात आहे का अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. खांडोळा - माशेल येथील गणपती मंदिर तसेच कुंकळ्ये येथे दुकान फोडीचा अयशस्वी प्रयत्न झाला मात्र झटापटीत दुकानदार जखमी झाला.

तिसरी मोठी चोरी तिस्क - उसगाव येथे झाली असून चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली. दोन्ही एटीएम मधून किती पैसे पळवले ते समजू शकले नाही. कुंकळ्ये - म्हार्दोळ नारायणवाडा येथे रात्री एका दुकानात शिरुन चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र दुकानदाराला संशय आल्याने त्याने धाव घेतल्याने चोरट्यांनी फ्रीजमधील बाटल्यांचा मारा त्याच्यावर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT