Goa News: स्‍वदेश दर्शनांतर्गत पर्यटनस्‍थळांचा विकास

श्रीपाद नाईक : पणजी कदंब बसस्थानकावर विशेष प्रदर्शन, नागरिकांचा उदंड प्रतिसाद
KTC Bus Stand
KTC Bus StandDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकारच्‍या स्‍वदेश दर्शन योजनेअंतर्गत राज्‍यातील पर्यटनस्‍थळांचा आणि ऐतिहासिक स्‍थळांचा विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्‍यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. येथील कदंब बसस्‍थानकावर आयोजित आझादी का अमृत महोत्‍सव प्रदर्शनाच्‍या पाहणीवेळी ते बोलत होते.

(Development of tourist places under Swadesh Darshan)

KTC Bus Stand
Ponda Master Plan|फोंडा शहरासाठी लवकरच मास्टरप्लान

केंद्रीय पर्यटन खात्‍याचे क्षेत्रिय प्रसार अधिकारी रियाज बाबू, राज्‍याच्‍या पर्यटन खात्‍याचे माहिती साहाय्यक अधिकारी समरजीत ठाकूर आणि कदंबचे अधिकारी उपस्‍थित होते. केंदीय माहिती आणि प्रसिद्धी खात्‍याच्‍यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरुणांनी इतिहासाचे वाचन करावे. आपल्‍या स्‍वातंत्र्यलढ्याचा अभ्यास करावा. यासाठी अशा प्रदर्शनांची आवश्‍यकता आहे. केंद्र सरकारने देशातील महत्त्वाच्‍या पर्यटनस्‍थळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यासाठी विविध योजना आखल्‍या असून स्‍वदेश दर्शन ही त्‍या योजनांपैकीच एक आहे. या योजनेच्‍या माध्यमातून राज्‍यातील महत्त्वाच्‍या पर्यटनस्‍थळांचा आणि ऐतिहासिक स्‍थळांचा विकास करण्यात येणार आहे. नेमक्‍या कोणत्‍या स्‍थळांचा विकास करायचा हे राज्‍य सरकार ठरवेल. त्‍यानुसार ते केंद्र सरकारकडे प्रस्‍ताव पाठवतील. त्‍यानंतर केंद्र सरकार या प्रस्‍तावांना मंजुरी देईल. याबाबत माझे केंद्रीय पर्यटनमंत्र्यांशी बोलणे झाले, असे नाईक म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com