Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीवासीयांनी पाहिला ‘वीरभद्रा’चा थयथयाट; उत्सव उत्साहात साजरा

Bicholim News : सांस्कृतिक वारसा, परंपरांची लोकांकडून जपणूक

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, ढोल-ताशे आणि समेळच्या ठेक्यावर आणि ‘धिन्ना था थय्या धिन्ना थय्या’च्या तालावर डिचोलीतील वैशिष्ट्यपूर्ण ‘वीरभद्र’ उत्सव रविवार, ७ रोजी रात्री परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशिष्ट पद्धतीने नाचणाऱ्या वीरभद्राचा थयथयाट पाहण्यासाठी आतीलपेठ भागात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

डिचोलीतील आतीलपेठ येथील श्री शांतादुर्गा मठ मंदिर देवस्थानच्या शिमगोत्सवातील वैशिष्ट्य आणि प्रमुख आकर्षण असलेल्या ‘वीरभद्र’ उत्सवाला सांस्कृतिक परंपरा आणि मोठा वारसा आहे. दरवर्षी धुळवडीच्या पूर्वरात्री ‘वीरभद्र’ साजरा करण्यात येतो. यंदा हा उत्सव भायलीपेठ महाजन आणि बाजारकर दहाजण मंडळातर्फे साजरा करण्यात आला.

रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास वीरभद्र साकारलेल्या व्यक्तीला (विनायक फोगेरी) विशिष्ट आणि पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आले. कायरो हॉस्पिटलसमोरील जंक्शनवर गाऱ्हाणे अर्थातच नमन झाल्यानंतर वीरभद्र उत्सवाला प्रारंभ झाला.

ढोल-ताशांच्या ठेक्यावर आणि ‘धिन्ना था थय्या धिन्ना थय्या’च्या तालावर हातात तलवारी घेतलेल्या वीरभद्राचा थयथयाट सुरू झाला. वाटेत गवताला लावलेली आग ओलांडून मार्गक्रमण करीत वीरभद्राचे मठ मंदिरात आगमन झाले.

देवीच्या सज्जाखाली येताच अवसररूपी वीरभद्राला उचलून रंगमंचावर नेण्यात आले. श्री देवी शांतादुर्गेचे तीर्थ तोंडात घालण्यात आले वीरभद्राच्या अंगात संचारलेला अवसर निवळल्यानंतर या उत्सवाची सांगता झाली.

‘वीरभद्रा’नंतर नाट्यप्रयोग

मठ मंदिरात आगमन होताना ‘वीरभद्रा’ची नजर देवीच्या नजरेशी एकरूप होणार नाही, त्याची काळजी घेण्यात येते.

तसेच सज्जाखाली येताच अवसर संचारून वीरभद्र आक्रमक होताच त्याला नियंत्रणात आणण्यात येते. वीरभद्र झाल्यानंतर नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT