सामुकरित्या हळद लागवड करताना शेतकरी Dainik Gomantak
गोवा

डिचोली: धुमासेतील शेतकऱ्यांची सामूहीकरित्या हळद लागवड

आयुर्वेदात (Ayurveda) हत्वाचे स्थान असलेल्या हळदीला (Turmeric) बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली तालुक्यातील साळ गावा पाठोपाठ कृषीप्रधान 'धुमासे' या छोट्याशा गावातील शेतकरीही आता हळद लागवडीकडे वळले आहेत. माजी आमदार नरेश सावळ यांच्या पुढाकारातून आणि कृषी खात्याच्या सहकार्याने धुमासेतील पाच कुटुंबातील शेतकऱ्यांनी मिळून दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या शेतजमिनीत (अडीज एकर) हळद लागवड केली आहे. (Cultivation of turmeric by Bicholim farmers)

धुमासेतील ज्येष्ठ शेतकऱ्यांसह युवकांनीही मोठ्या उत्साहात हळद लागवड केली आहे. नरेश सावळ हेसुद्धा शेतकऱ्यांसमवेत हळद लागवडीत उतरले आहेतl. भिसो नाईक, न्हानू नाईक, नारायण नाईक, आनंद नाईक, रवींद्र नाईक, उमानाथ नाईक, अर्जुन नाईक आदी पाच कुटुंबातील शेतकऱ्यांनी सामूहीकरित्या हळद लागवड केली आहे.

औषधी गुणधर्म असलेल्या आणि दैनंदिन आहारातील एक मुख्य घटक असलेल्या हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी आणि सामाजिक क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. आयुर्वेदात महत्वाचे स्थान असलेल्या हळदीला बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. हळद एक नगदी पिक म्हणून पाहिले जात आहेच. यामुळेच आणि नरेश सावळ यांनी सहकार्य केल्यानेच धुमासेतील शेतकऱ्यांनी हळद लागवड करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहेत. हळद पिक घेण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत नाही. आणि रानटी जनावरांपासूनही या पिकाला उपद्रव होण्याचा धोका नसतो. साळ पाठोपाठ धुमासेतील शेतकरी हळद लागवडीकडे उतरल्याने या दोन्ही गावांची 'हळद' क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Devendra Fadnavis In Goa: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'डिजिटल लोकशाही संवाद' कार्यक्रमासाठी गोव्यात दाखल

Rama Kankonkar Assault: 'त्या मंत्र्याचे नाव जाहीर करा, कोड्यात काय बोलता...' रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात सुदिन यांचं प्रतिआव्हान

USA Cricket Board Suspended: पाकिस्तानची दाणादाण उडवणाऱ्या अमेरिका संघाला ICC चा दणका, सदस्यत्व केलं निलंबित; 'हे' ठरलं कारण

IND vs AUS: 14 वर्षांचा पोरगा बनला षटकारांचा नवा बादशाह! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; तूफानी खेळीनं उडवली कांगांरुची झोप VIDEO

Goa Rain: काळजी घ्या! पाऊस पुन्हा गोव्यात, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट', 6 दिवस जोरदार कोसळणार

SCROLL FOR NEXT