Goa Mining  Dainik Gomantak
गोवा

Cudnem News: लोकांचा पाठिंबा मात्र रूद्रेश्वर देवस्थान समितीने घेतली हरकत! कुडणे खाण अहवालात धबधबा, गुहांचा उल्लेखच नाही

Cudnem Mine: ग्रामस्थ, परिसरातील पंचायती, पालिका प्रतिनिधी यांनी खाणीला ‘हिरवा कंदील’ दाखविला. मात्र, हरवळेतील श्री रूद्रेश्वर देवस्थान समितीने हरकत घेतली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Cudnem Mining News

साखळी: करमळे-कुडणेतील ब्लॉक-६ मे. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या जनसुनावणीत कुडणे ग्रामस्थ, परिसरातील पंचायती, पालिका प्रतिनिधी यांनी खाणीला ‘हिरवा कंदील’ दाखविला. मात्र, हरवळेतील श्री रूद्रेश्वर देवस्थान समितीने हरकत घेतली आहे. समरी अहवालात धबधबा, पांडवकालीन गुंफा दाखविलेली नाही. तसेच ही खाण देवस्थानपासून अवघ्या ४६ मीटर अंतरावर असल्याने हरकत घेतली आहे. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शमिला मोंतेरो आणि अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगार द्या!

कुडणे, न्हावेली, सुर्ल, आमोणा, हरवळे, साखळीतील लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य यांनी जनसुनावणीस उपस्थित राहून सूचना केल्या. गावाचे हित सांभाळावे. बेरोजगारांना रोजगार मिळावा. स्थानिक ट्रकवाल्यांना प्राधान्य मिळावे. पर्यावरणाचा समतोल राखावा. शेतांमध्ये साचलेली माती काढून शेतीस प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना मांडण्यात आल्या.

ॲड. अमित पालेकर यांचे आक्षेप

१) समरी अहवालात हरवळेचा प्रसिद्ध धबधब्याचा उल्लेख नाही. या धबधब्याच्या पाणी प्रवाहावर काय परिणाम होणार, याची माहिती दिलेली नाही.

२) मंदिर आहे, जे बांधण्यात आले होते, असे म्हटले आहे. रूद्रेश्वर हा स्वयंभू देव आहे. त्याचा इतिहास कोणालाही माहीत नाही.

३) पांडवकालीन गुहांचा उल्लेख नाही. त्या खाणीपासून केवळ २०० मीटर अंतरावर आहेत. कायद्याप्रमाणे या गुहांपासून ४०० मीटर अंतरावर कोणतीही प्रक्रिया होऊ शकत नाही.

४) देवस्थान व सभोवताली असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचा योग्य मान व सुरक्षा राखून खाणी सुरू व्हाव्यात. त्यासाठीच्या हरकती लेखी स्वरूपात दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT