Tragic Death Dainik Gomantak
गोवा

Cuchelim: कामाला जातो म्हणून बाहेर पडले, 2 दिवसांनी सापडला मृतदेह; कुचेलीतील बेपत्ता व्यक्तीने घेतला टोकाचा निर्णय

Cuchelim Death News: दोन दिवस ते घरी परतले नाही. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी कुटुंबीयांनी म्हापसा पोलिस स्थानकात लक्ष्मण हे बेपत्ता असल्याची लेखी तक्रार दिली होती.

Sameer Panditrao

म्हापसा: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुचेली येथील ४९ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे सकाळी उघड झाले. लक्ष्मण बिचोलकर असे (रा. खडपावाडा, कुचेली) या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हे १६ नोव्हेंबर रोजी कामाला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते.

दोन दिवस ते घरी परतले नाही. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी कुटुंबीयांनी म्हापसा पोलिस स्थानकात लक्ष्मण हे बेपत्ता असल्याची लेखी तक्रार दिली होती. पोलिस त्यांचा शोध घेत, मोबाईल ट्रॅक करत होते.

त्यानुसार, मंगळवारी सकाळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना माळरानावरील झुडपात एक दुचाकी व झाडाला गळफास लावलेल्या अस्वस्थेत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह बिचोलकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ‘गोमेकॉ’त पाठवला. प्रथमदर्शनी पोलिसांनी याप्रकरणी काहीही संशयास्पद आढळलेले नाही. लक्ष्मण हे मानसिक तणावाखाली असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.

अपघातात पर्यटक युवती ठार

पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दिल्लीच्या पर्यटक युवतीचा उपचारादरम्यान निधन झाले. लावण्या जून (वय १८ वर्षे) असे या युवतीचे नाव आहे. हा अपघात पर्वरी येथील होली फॅमिली चर्चजवळील क्रॉसिंगवर घडला. हा अपघात १७ रोजी पहाटे घडला.

मलिक खतीब (वय २२, बेती) हा चारचाकीने म्हापशाहून पर्वरीच्या दिशेने जाताना त्याच्या गाडीची धडक रस्ता ओलांडणाऱ्या ‘रेंट अ कॅब’ कारला बसली. हा धक्का कारच्या डाव्या बाजूला बसल्याने गाडीतील प्रवासी लावण्या ही गंभीर जखमी झाली. तिला इस्पितळात दाखल केले असता, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गौळादेवीच्‍या जत्रोत्‍सवामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी, 18 किलोमीटरच्‍या प्रवासाला तब्‍बल 6 तास; मंत्र्यांनाही आला विदारक अनुभव

Goa Shigmotsav: ढोल-ताशे, कांसाळी अन् 'निशाण'चा मान! गोव्यात कसा रंगतो शिगम्याचा उत्साह?

काणकोणातील 'दिवज' परंपरा धोक्यात, समिती अहवाल सरकारदरबारीच; कारवारहून दिवजांची आयात

'AI' आभाळाला भिडलं तरी 'गुरु'ची जागा घेणार नाही; अमेरिकेतील वैमानिकांच्या 'त्या' प्रयोगातून जगाला मिळाला मोठा धडा!

Anil Chaudhry Dance: "गोली तो चलेगी!" अंपायर अनिल चौधरींचा कडक स्वॅग; 'या' व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली आग Watch Video

SCROLL FOR NEXT