Court Dainik Gomantak
गोवा

Cuchelim Comunidade Land Case: अवैध भूखंड विक्रीप्रकरणी संशयित रमेश रावचा कोर्टाने फेटाळला जामीन

Panaji Additional Sessions Court: कुचेली कोमुनिदादमधील भूखंडांची बेकायदा विक्रीप्रकरणातील म्हापसा नगरसेवक असलेला संशयित रमेश राव याला पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कुचेली कोमुनिदादमधील भूखंडांची बेकायदा विक्रीप्रकरणातील म्हापसा नगरसेवक असलेला संशयित रमेश राव याला पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. ज्या प्रकरणात संशयिताला अटक झाली आहे तो गुन्हा गंभीर आहे. त्यामध्ये अनेकजण गुंतलेले आहेत. तपास प्राथमिक टप्प्यात असून संशयितांची व इतरांची भूमिका याचा तपास पोलिसांना करायचा असल्याने जामीन देणे योग्य होणार नसल्याचे निरीक्षण केले आहे.

म्हापसा नगरसेवक संशयित रमेश राव तसेच कुचेली कोमुनिदादच्या सदस्यांनी कटकारस्थान रचून तक्रारदारांना भूखंड वितरित केले होते व सुमारे ३८.४९ लाख रुपये घेतले होते. ही जमीन कुचेली कोमुनिदादची असतानाही हा बेकायदेशीर व्यवहार केला होता. तक्रारदारांना भूखंडांचे दस्तावेज त्यांच्या नावावर करून देण्याचेही आश्‍वासन दिले होते.

दरम्यान बार्देश येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण केलेले भूखंड रिक्त करण्याची नोटीस तक्रारदारांना बजावली होती. हे भूखंड तक्रारदारांच्या नावे केले नाहीत त्यामुळे दिलेली रक्कम परत करण्याची मागणी संशयितांकडे करण्यात आली होती. संशयित व इतरांनी तक्रारदारांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार शकील हमीद शेख व रमेश राव या दोघांना २० नोव्हेंबर २०२४ रोजी अटक झाली होती. पोलिस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे.

संशयिताने इतरांबरोबर कटकारस्थान रचून तक्रारदारांना फसविले आहे. त्यामुळे त्याची भूमिका काय होती, याचा तपास करण्यासाठी आणखी वेळ हवा आहे. तक्रारदारांनी संशयिताचे नाव नमूद केले आहे. तो या भूखंड विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे तो न्यायालयीन कोठडीत राहणे आवश्‍यक आहे. भूखंड संदर्भात त्याने व त्याच्या साथीदारांनी जे व्यवहार केले आहेत त्याचा शोध घ्यायचा आहे. त्याने तक्रारदारांकडून घेतलेल्या रक्कम वसूल करायची आहे, अशी बाजू पोलिसांनी (Police) मांडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

Sunburn Dhargalim: धारगळवासीयांचा ‘सनबर्न’ला विरोध, सुनावणीला मात्र गैरहजर; न्यायालयाकडून याचिका निकाली

Goa Politics: ..हा तर लोकशाहीचा खून! विधानसभा रणनीतीच्या बैठकीच्या जागी सभापती तवडकर; विरोधकांचे टीकास्त्र

Goa Politics: विरोधकांच्‍या बैठकीला विजय सरदेसाई, वीरेश गैरहजर! ‘आप’च्‍या दोन्‍ही आमदारांची उपस्‍थिती

Rashi Bhavishya 16 July 2025: आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या, आरोग्याची विशेष काळजी घेणं महत्वाचं

SCROLL FOR NEXT