CRZ Goa Regulations Dainik Gomantak
गोवा

CRZ Goa: शॅकधारकांकडून ‘सीआरझेड’चे उल्लंघन, नियम धाब्यावर

‘जीसीझेडएमए’च्या तपासणी अहवालातून विदारक सत्य उघड

दैनिक गोमन्तक डिजिटल

CRZ Goa: गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (जीसीझेडएमए) नेतृत्वाखाली गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या संयुक्त तपासणीत कळंगुटमधील बहुतेक शॅकधारकांनी समुद्र किनाऱ्यांवर बोअरवेल, विहिरी व सोकपीट बांधून किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

जीसीझेडएमए यांनी पर्यटन विभाग, जलस्रोत विभाग व गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकाऱ्यांसह कळंगुट व कांदोळी येथे केलेल्या संयुक्त तपासणीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला.

रुबेन फ्रँको यांनी किनाऱ्यांवरील कथित गैरप्रकारांविषयी न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने या तिन्ही अधिकारिणींना कळंगुट, कांदोळी किनाऱ्यांवरील कथित बांधकामांची पाहणी करण्यास सांगितले होते. या पाहणीत सीआरझेड क्षेत्रात बोअरवेल, विहिरी व सोकपीट उभारल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.

पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कळंगुटमध्ये पाहणी केली असता, तिथे 102 परवानगी असलेले शॅक आहेत. कांदोळी पंचायत क्षेत्रातील 78 शॅकची तपासणी केली. यातील बहुतेक शॅकवाल्यांनी सीआरझेडचे उल्लंघन केल्याचे आढळले.

पाच दिवस तपासणी केली असता आंतरभरती क्षेत्रात सर्व शॅक उभारल्याचे निदर्शनास आले. कळंगुटमध्ये गौरावाडा परिसरात सर्वाधिक उल्लंघन आढळले. तेथे 22 पैकी 19 शॅकधारकांकडून, तर तिवायवाडो परिसरातील 17 पैकी 12 जणांनी सीआरझेड नियमांचे उल्लंघन केले.

कारवाई केल्यास आंदोलन

1. जलस्रोत भूजल अधिकाऱ्यांनी यापूर्वीच 16 बोअरवेल सील केल्या आणि कळंगुट किनाऱ्यावरील चार बोअरवेल काढून टाकल्या. शॅक धोरणानुसार, गोवा भूजल नियमन अधिनियम 2002 व नियम 2003 अंतर्गत अशा बोअरिंगना परवानगी नाही. तसेच विहिरींना परवानगी दिली जात नाही.

2. पर्यटन विभागाने पूर्वीच 58 शॅकधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून उल्लंघन केल्याबद्दल कामकाज का बंद करू नये व परवाने का रद्द करू नयेत, अशी विचारणा केली होती. शॅकधारकांना त्यांनी केलेल्या चुका सुधारून गुरुवारपर्यंत नियमांचे पालनाच्या सूचना केल्या होत्या.

3. यासंदर्भात नुकतीच शॅकमालक संघटनेची बैठक झाली. त्यात पर्यटन विभागाने एकाही शॅकधारकाचा परवाना रद्द केल्यास राज्यभरातील शॅक बंद ठेवून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.

अविकसित क्षेत्रातही केली बांधकामे

काही शॅकधारकांनी सांडपाणी जमिनीखाली सोडले, तर काहीजण सरकारी मालमत्तेतील विहिरीचे पाणी वापरतात. काहींनी अविकसित क्षेत्रात स्वच्छतागृहे बांधली आहेत.

काही शॅकचे उच्च भरती रेषेपासून (एचटीएल) 200 मीटरच्या आत बांधकाम केल्याचे पाहणीमध्ये आढळले. या अधिकाऱ्यांनी कळंगुटमध्ये पाच तर ‘एनडीझेड’मधील कांदोळी भागात सहा उघड्या विहिरी शोधून काढल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT