Goa Shipyard Blast: लोटली येथे शिपयार्डमध्ये आगीमुळे मोठा स्फोट; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू; 4 जखमी

Vijay Marine shipyard blast: रासई-लोटली येथे विजय मरीन शिपयार्डमध्ये जहाज बांधणीचे काम सुरू असताना अचानक आग लागून मोठा स्फोट झाल्याने दोघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
Vijay Marine shipyard blast
Vijay Marine shipyard blastDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रासई-लोटली येथे विजय मरीन शिपयार्डमध्ये जहाज बांधणीचे काम सुरू असताना अचानक आग लागून मोठा स्फोट झाल्याने दोघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य चार कामगार जखमी झाले. या दुर्घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मायणा-कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अभिषेक कुमार, मनीष चौहान, मोहम्मद बबलू तसेच अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या दोन कामगारांची ओळख अजूनही पटू शकलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हा स्फोट नेमका कसा झाला, त्याचे कारण सध्या पोलिस शोधत आहेत. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी सध्या पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Vijay Marine shipyard blast
Blast in Pakistan: पाकिस्तानचे 'अणु तळ' धोक्यात! 12 शहरात 25 ड्रोन हल्ले; रावळपिंडी-सियालकोटमध्ये नागरिकांची पळापळ

सर्वेक्षकाचा हलगर्जीपणा नडला

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली. या शिपयार्डमध्ये जहाज बांधणीचे काम सुरू असताना काही कामगार वेल्डींग करीत होते. त्यावेळीच हा स्फोट झाला. सुरक्षा सर्वेक्षक तेथे होता. त्याने कामात हलगर्जीपणा केला होता, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Vijay Marine shipyard blast
Lotulim Crime: गोव्यात धावत्या बसमध्ये युवतीचा विनयभंग! संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद

‘ते’ कामगार रोजंदारीवरील

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. काही वेळानंतर पोलिस अधिकारीही घटनास्थळी हजर झाले. मृत कामगारांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. ते रोजंदारीवरील कामगार होते, असे पोलिस तपासात आढळून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Hunan fireworks factory explosion 2026
vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
MLA Vijai Sardesai Court Warning
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com