Arambol : पर्यटकांनीच रंगविले किनारी भागात गतिरोधक

गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण जास्त
Speed breaker
Speed breakerDainik Gomantak
Published on
Updated on

Arambol : येथील किनारी भागातील अधिकतर पंचायत क्षेत्रांत वाहतूक खात्याकडून रंगविले जाणारे गतिरोधक रंगहीन बनले आहेत. त्यामुळे दुचाकीवरून पर्यटक पडून जखमी होत असल्याच्या घटना नित्य घडत आहेत. त्याचा परिणाम म्हणून त्यांचीच मित्रमंडळी गतिरोधक रंगवत आहेत. यातून पर्यटकच सरकारची अब्रू वेशीवर आणीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Speed breaker
ATS Officer Bribery Case : ‘एटीएस’ खंडणी वसुली प्रकरण तक्रारीअभावी दडपण्याचा प्रयत्न; राजकीय हस्तक्षेप

गेल्या आठवड्यात एका विदेशी पर्यटक जोडप्याची गाडी गतिरोधक न दिसल्याने उसळून पडल्याची घटना घडली. त्या पर्यटकाच्या पायाचे हाड मोडले. त्याची अवस्था पाहून त्यांच्या मित्रमंडळींनी त्या गतिरोधकावर पांढरे पट्टे रंगविले असून किमान गतिरोधक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तिठा भागात तीन गतिरोधक असून एचडीएफसी बँकेसमोरील गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण जास्त असते, असे मत विजय नाईक यांनी व्यक्त केले.

Speed breaker
कट्टर राष्‍ट्रवादाचे ओंगळवाणे प्रदर्शन; अल्पसंख्याकांना दमदाटी

सरकारची अब्रू वेशीवर

वाहतूक खाते केवळ ‘टार्गेट’ पूर्ण करण्यात व्यस्त असल्याने गतिरोधकांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. विदेशी पर्यटक गतिरोधक रंगवतात याचे आश्चर्य तर आहेच.

मात्र, खात्याच्या उदासीनतेमुळे सरकारची अब्रू निघत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.वाहतूक खात्याचा निषेध

पेडणे तालुक्यातील अनेक पंचायत क्षेत्रांत गतिरोधक असून 99 टक्के गतिरोधकांवर रंगच नसल्याने वाहनचालकांना जायबंदी व्हावे लागते.

किमान पावसाळा उलटल्यानंतर गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग रंगविणे आवश्यक असते. वाहतूक खात्याला शक्य नसल्यास त्यांनी संबंधित पंचायतींना जबाबदारी द्यावी, असे विदेशी पर्यटक लिकार्ड यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com