Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Yusuf Pathan Viral Post: क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकारणात एन्ट्री केलेला आणि सध्या तृणमूल काँग्रेसचा (TMC) खासदार असलेला युसूफ पठाण नव्या वादात सापडला.
Yusuf Pathan Post Controversy
Yusuf PathanDainik Gomantak
Published on
Updated on

Yusuf Pathan Post Controversy: क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकारणात एन्ट्री केलेला आणि सध्या तृणमूल काँग्रेसचा (TMC) खासदार असलेला युसूफ पठाण नव्या वादात सापडला. पठाणने पश्चिम बंगालमधील मालदा येथे असलेल्या 'आदिना मशीद' (Adina Mosque) बद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यावरुन भाजपने त्याला घेरले.

युसूफने सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो शेअर केले. त्यासोबत त्याने लिहिले की, "पश्चिम बंगालमधील मालदा येथे असलेली आदिना मशीद ही एक ऐतिहासिक मशीद आहे. तिचे बांधकाम 14व्या शतकात इलियास शाही वंशाचा दुसरा शासक सुलतान सिकंदर शाह याने केले होते. 1373-1375 मध्ये बांधलेली ही मशीद त्या काळात भारतीय उपखंडातील सर्वात मोठी मशीद होती, जी या प्रदेशाच्या स्थापत्यकलेची भव्यता दर्शवते."

Yusuf Pathan Post Controversy
TMC Candidate List 2024: काँग्रेसला ममतांचा दे धक्का! क्रिकेटर युसूफ पठाणला TMC कडून लोकसभेचं तिकीट; 42 उमेदवारांची यादी जाहीर

या फोटोंमध्ये युसूफ पठाण स्वतःही दिसत आहे. मात्र पठाणच्या या पोस्टवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला. भाजपने (BJP) दावा केला की, हे ठिकाण 'आदिना मशीद' नसून 'आदिनाथ मंदिर' आहे. यानंतर सोशल मीडियावर या ऐतिहासिक जागेच्या अस्तित्वावरुन मोठा वाद सुरु झाला.

युसूफ पठाणच्या पोस्टवर गदारोळ

युसूफच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला. युसूफ या ऐतिहासिक ठिकाणाची पाहणीसाठी गेला असावा, असे फोटोंवरुन दिसते. त्याने तिथले फोटो शेअर करताच सोशल मीडियावरील अनेक यूजर्संनी त्या फोटोंचा आधार घेऊन या जागेला 'विशाल हिंदू मंदिर' म्हणायला सुरुवात केली. दरम्यान, या वादावर युसूफ पठाणची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Yusuf Pathan Post Controversy
Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'कुत्र्याचे मांस खाल्ले म्हणून भुंकतोय' इरफान पठाणच्या टीकेवर शाहिद आफ्रिदी भडकला; म्हणाला, "मी त्याला मर्द..."

युसूफ पठाणने गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील बहरमपूर (Bahrampore) मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्याने या लढतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी यांचा पराभव करुन लोकसभा गाठली होती. पठाण मूळचा गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर वडोदरा येथे महापालिकेच्या एका भूखंडावर (Plot) कब्जा केल्याचाही आरोप आहे. त्याचवेळी, आता तो आणखी एका वादात सापडला.

Yusuf Pathan Post Controversy
Pathan :'सेल्फी' आणि 'शेहजादा'चे शो रद्द करून त्याजागी पठाण'चे शो?

दुसरीकडे, सोशल मीडियावर यूजर्स त्याच्या पोस्टवर लिहीत आहेत की, "युसूफ पठाण, तुम्ही ज्या आवारात उभे आहात, ते एक विशाल हिंदू मंदिर आहे." यावरुन आता धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवरुन सुरु असलेला वाद पुन्हा एकदा राजकीय वळण घेऊ लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com