Vessel Empress Dainik Gomantak
गोवा

Cruise Tourism Seasons: क्रूझ पर्यटनाला शुभारंभ! पहिले देशी क्रूझ गोव्यात दाखल

क्रूझ पर्यटन हंगामात यंदा 36 देशी, 16 विदेशी असे 52 क्रूझ गोव्यात दाखल होणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Cruise Tourism Seasons: गोव्यातील क्रूझ पर्यटनाला आजपासून (30 सप्टेंबर) सुरूवात झाली आहे. पर्यटन हंगामातील पहिले देशी क्रूझ गोव्यात दाखल झाले आहे. मुंबईमधून आलेल्या कार्डेलिया एम्प्रेस (Vessel Empress) या क्रूझमधून 785 गेस्ट आणि 360 क्रू मेंम्बर गोव्यात दाखल झाले आहेत. क्रूझ पर्यटन हंगामात यंदा 36 देशी, 16 विदेशी असे 52 क्रूझ गोव्यात दाखल होणार आहेत.

(Cruise Tourism seasons first domestic cruise vessel Empress arrives to Goa from Mumbai)

यंदाचा समुद्र पर्यटन हंगामाला 30 सप्टेंबर पासून 'कार्डेलिया एम्प्रेस' या जहाजाने सुरुवात झाली आहे. या समुद्र पर्यटन मोसमात एकूण 51 देशी विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत. यात 35 फेऱ्या कार्डेलिया या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या तर 16 फेऱ्या विदेशी जहाजांच्या असणार आहेत. यामध्ये एकूण 7 लाख 45 हजार देशी विदेशी पर्यटक समुद्र मार्गे गोव्यात दाखल होणार असल्याने समुद्र पर्यटनाला आरंभ होत असल्याने पर्यटन व्यवसायाला तेजी येण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना महामारीमुळे 2020 पासून समुद्र पर्यटन बंद झाल्याने टॅक्सी, बस रेस्टॉरंट व इतर संबंधित व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे देशी जहाजाबरोबर विदेशी जहाजांची रेल चेल पूर्णपणे बंद झाली होती. त्यानंतर वर्ष 2021 पासून समुद्र पर्यटन हंगाम सुरू झाल्याने, पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने, देशांतर्गत समुद्र पर्यटन सुरू करून केंद्र सरकारने एका प्रकारे पर्यटन हंगामाला चालना दिली आहे.

2021 साली 27 सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत कार्डेलिया या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या एकूण 20 फेऱ्या झाल्या. नंतर 2022 साली जानेवारी ते मे पर्यंत 22 फेऱ्या झाल्या आहेत. यात 42 फेऱ्या सुमारे 84 हजार पर्यटक गोव्यात दाखल झाले होते.

दरम्यान, विदेशी पर्यटक जहाजे युरोप कंट्री मधून दुबई, मस्कत, श्रीलंका असा प्रवास करत भारतात मुंबई, न्यू मंगलोर, कोचिंग असा प्रवास करून गोव्यात मुरगांव बंदरात दाखल होणार आहेत. सध्या विदेशी जहाजांची कॅरेबियन देशात वर्दळ सुरू आहे. त्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव नसल्याने सागरी पर्यटन हंगामाला जोमाने सुरू आहे. दरम्यान गोव्याच्या सागरी पर्यटन हंगाम यंदाचा 30 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. मुरगाव बंदरात पर्यटक जहाज दाखल होणार असल्याने व्यावसायिक सुखावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT