Goa ECI Dainik Gomantak
गोवा

Goa ECI: गोव्यात दारू, ड्रग्ज, पैसा, भेटवस्तूंची खैरात; निवडणूक आयोगाकडून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Election Commission of India: लोकसभेच्या केवळ दोन जागा असणाऱ्या देशातील सर्वात लहान राज्यात आयोगाने केलेल्या जप्तीचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे.

Pramod Yadav

Goa ECI

देशात नुकतेच लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार असून, त्यापूर्वी राज्यात मतदारांना खूष करण्यासाठी विविध प्रलोभने द्यायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोग याकडे करडी नजर ठेऊन आहे. आयोगाच्या कारवाईत गोव्यातून कोट्यवधी किंमतीची दारू, अमली पदार्थ, रोख रक्कम आणि भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. राज्यातील मतदान अवघ्या तीन आठवड्यांवर असताना आयोगाने ही कारवाई केली आहे.

गेल्या सहा आठवड्यात (1 मार्च ते 13 एप्रिल, 2024) गोव्यात निवडणूक आयोगाने (ECI) एक लाख लिटरहून अधिक दारू, ₹15.64 कोटी रोख रक्कम, ₹3.23 कोटी रुपयांचे अमली पदार्थ आणि ₹1.18 कोटी रुपयांच्या भेटवस्तू जप्त केल्या आहेत.

लोकसभेच्या केवळ दोन जागा असणाऱ्या देशातील सर्वात लहान राज्यात आयोगाने केलेल्या जप्तीचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. याच कालावधीत गुजरातमध्ये ₹6.5 कोटी, राजधानी दिल्लीत ₹11.28 कोटी, उत्तराखंडमध्ये ₹6.1 कोटी आणि ओडिशामध्ये ₹1.47 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याउलट, नागालँड, लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये एक रुपयांची देखील रोकड जप्त केल्याची माहिती समोर आलेली नाही.

गोव्यात गेल्या सहा आठवड्यांत एकूण ₹3.23 कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच, गुजरातमध्ये ₹485 कोटी, महाराष्ट्रात ₹213 कोटी, पंजाबमध्ये ₹280 कोटी आणि तामिळनाडूमध्ये ₹293 कोटींचा साठा जप्त करण्यात आला.

ECI च्या इलेक्शन सीझर मॅनेजमेंट सिस्टीम (ESMS) मध्ये, ECI ने इन-हाउस इंटरसेप्शन आणि सीझर्सच्या रिअल-टाइम रिपोर्टिंगसाठी पोर्टल विकसित केले आहे.

गोव्यात 101,446 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे, विशेष म्हणजे गुजरात आणि बिहार या दोन्ही ड्राय स्टेटमध्ये अनुक्रमे 760,062 लिटर आणि 845,758 लिटर दारू जप्त करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT