डिचोलीत (Bichlolim) नदीकाठी (River) वॉकिंग ट्रॅकवर (Walking Track) अडकलेल्या सुमारे 3 मीटर लांबीच्या मादी मगरीला (Crocodile) अखेर जीवनदान मिळाले आहे. प्राणीमित्र (Animal catcher) अमृतसिंग तसेच इतरांच्या लोकांच्या अथक प्रयत्नानंतर सदर मगरीला सुखरूप पकडून दुपारी वन खात्याच्या (Forest Department) स्वाधीन करण्यात आले. गुरुवारी (दि.१५जुलै) गावकरवाडा परिसरात नदीकिनारी वॉकिंग ट्रॅक जवळील ग्रिलमध्ये ही मगर अडकून पडली होती. याची माहिती मिळताच अमृतसिंग यांनी त्याठिकाणी धाव घेवून अन्य प्राणीमित्र आणि त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने या मगरीची सुरक्षित सुटका केली.
गोव्यात सध्या जोरदार पाऊस पडत असल्यामुळे जवळ जवळ सर्वच नद्यांची पात्रे भरलेली आहेत त्यामुळे नद्या भरून वाहू लागल्या आहेत. ही मगर कदाचित नदीच्या वाढलेल्या प्रवाहाबरोबर वाहून आली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर मगरीच्या मानेवर किंचित जखम झाली असली, तरी ती सुखरूप आहे. कदाचित ग्रिलमधून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात ही मगर खरचटली असावी, अशी माहिती प्राणीमित्र अमृतसिंग यांनी आमचे डिचोली - साखळी येथील गोमन्तकचे प्रतिनिधी तुकाराम सावंत यांच्याकडे बोलताना दिली. मगर पकडल्याची माहिती वन खात्याच्या केरी येथील क्षेत्रीय विभागाला देण्यात आल्यानंतर दुपारी वनखात्याने या मगरीला आपल्या ताब्यात घेतले. तसेच प्राणीमित्र चरण देसाई यांच्या अभ्यासानुसार गोव्यात मगरींची पैदास वाढत असल्याचे अमृतसिंग यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.