Goa Drug Case
Goa Drug Case  Dainik Gomantak
गोवा

Anjuna : हणजूण येथे गुन्हा शाखेचा छापा; तब्बल 3 लाखांचे चरस जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा पोलिस यंत्रणा सज्ज आहे. अंमली पदार्थ, चोऱ्या तसेच रात्री उशिरा परवानगीशिवाय पार्ट्यांमध्ये संगीत वाजवून ध्वनी प्रदूषण करणारे यांच्याविरुद्ध लक्ष ठेवण्यासाठी १० पोलिस पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामध्ये अंमली पदार्थविरोधी, क्राईम ब्रँच, फोरेन्सिक कक्षातील पोलिसांचा समावेश आहे. सनबर्न पार्टी व नववर्ष साजरे करण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्यने पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. संगीतरजनी पार्ट्यांसाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणात अवैध अंमली पदार्थांची विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेने हणजूण येथे अंमली पदार्थ विरोधात छापा टाकत कारवाई केली आहे. पथकाने तब्बल 3 लाखांचा 505 ग्रॅम चरस जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने काल मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी हणजूण येथील एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल मध्यरात्रीच्या सुमारास संशयित सुरू असलेल्या एका संगीतरजनी पार्टीच्या बाहेर काही पर्यटकांशी बातचीत व घुटमळत असल्याचे पोलिसांच्या दृष्टीस पडले. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत तो उत्तरे देण्यास गडबडला. त्यामुळे त्याची झडती घेण्यात आली. यावेळी झडतीत त्याच्याजवळ प्लास्टीक पिशवीत काळ्या रंगाचा चिकट पदार्थ सापडून आला. यावेळी अधिक तपासणी केली असता तो पदार्थ चरस असल्याचे समोर आले. त्याने हा चरस एका ड्रग्ज दलालकडून घेतला होता व पुढील काही दिवसांत त्याची विक्री पर्यटकांना करणार असल्याचे उघड केले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.

दरम्यान, सनबर्नमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी आलेल्या एका आंतरराज्य टोळीचा कट उत्तर गोवा पोलिसांनी उधळून लावला आहे. उत्तर गोवा पोलिसांनी बारा जणांच्या आंतरराज्या टोळीला अटक केली आहे. सनबर्न निमित्त होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरी करण्याचा डाव उत्तर गोवा पोलिसांनी उधळून लावला आहे. त्याच्याकडून तीस लाख रूपये किंमतीचे तब्बल 41 मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय काही प्रमाणात अमली पदार्थ देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart City : जेव्हा राजधानी पणजी शहराचे वय शोधले जाते...

Pernem Accident : धारगळमधील ‘तो’ अपघात की खून? तरुणाचा मृत्यू

Water Scarcity : पाणी टंचाईबाबत बेतोडावासीय आक्रमक; अधिकाऱ्यांना विचारला जाब

OCI Card Issue : ‘ओसीआय’प्रकरणी जनतेची फसवणूक : आमदार कार्लुस फेरेरा

Fire Brigade : अग्निशमनचे ‘मल्टिटास्क युनिट’; रायकर यांची माहिती

SCROLL FOR NEXT