Porvorim Betting on IPL match  Dainik Gomantak
गोवा

IPL Betting in Goa : आयपीएल’ सट्टेबाज टोळीचा पर्दाफाश; 14 अटकेत

पर्वरीत क्राईम ब्रँचचा छापा

दैनिक गोमन्तक डिजिटल

सध्या सुरू असलेल्या आयपीएल टी-20 सामन्यांवर देशभरात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू आहे. क्राईम ब्रँचने गुरुवारी पर्वरी येथील पीडीए कॉलनीतील एका बंगल्यावर छापा टाकून सट्टेबाजीप्रकरणी छत्तीसगड येथील 14 जणांना गजाआड केले.

यावेळी त्यांच्याकडून 47 मोबाईल्स, तीन एलईडी टीव्ही, एक लॅपटॉप, तीन टाटा स्काय सेट टॉप बॉक्सेस, एक राऊटर तसेच 38 हजार रोख मिळून सुमारे 25.38 लाखांचे साहित्य जप्त केले.

जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. अशी सट्टेबाजी राज्यातील आणखी काही हॉटेलांमध्ये सुरू असण्याची शक्यता असल्याने खबऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे.

काही हॉटेलचालकांना जे खोलीमधून बाहेर पडत नाहीत, अशा पर्यटकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. गोवा हे सुरक्षित ठिकाण असल्याने दरवर्षी आयपीएल टी-20 सामन्यावेळी सट्टेबाज येथे भाडेपट्टीवर बंगले वा फ्लॅट घेऊन राहातात. यापूर्वी हा व्यवहार हॉटेलातील खोल्यांमधून चालवायचे.

मात्र, हॉटेल व्यवस्थापनाकडूनच त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचण्याची शक्यता असल्याने हे सट्टेबाज बंगले वा फ्लॅट भाडेपट्टीवर घेतात. त्यामुळे या कारवाईवेळी संशयितांनी किती सट्टेबाजी केली, त्याची माहिती सायबर कक्षाच्या मदतीने गोळा करणार असल्याचे अधीक्षक वाल्सन यांनी सांगितले.

सर्व छत्तीसगडचे

या कारवाईत अटक केलेले सर्वजण छत्तीसगडचे आहेत. त्यात रणजीत गेदाम (28), प्रवीण राजपूत सिंग (24), अंकित चंद्रभूषण चौदीधर (24) , मोहीतकुमार ब्रीजदेव तिवारी (28), नंदा किशन दलवानी (54), ज्योतिप्रकाश कुमार किशन (38), अयाझ खान (26), केशम कुमार यादरो (20), जगदीश अर्जुन वर्मा (24), राजन राकेश दुबे (23), कवल प्रीतम सिंग (40), पंकज गौतम चौरे (27), मनजीत एस. सिंग (41), नितीश बालेंद्र पांडे (19) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT