Crime Branch Busts Illegal Call center Dainik Gomantak
गोवा

Fake Call Center : माजोर्डातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

9 जणांच्या टोळीचा पर्दाफाश; उपकरणांसह लाखोंचा ऐवज जप्त

दैनिक गोमन्तक

Defrauding American citizens Call centre exposed : माजोर्डा येथील आडाववाडा-खिरभाट येथील आरवन हॉलिडे होम्समध्ये बनावट कॉल सेंटर सुरू करून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी या सेंटरवर छापा टाकून 9 जणांना अटक करून मोबाईल, लॅपटॉप, राऊटर्स, हेडफोन्स, मोडेम तसेच 65 हजारांची रोख रक्कम मिळून 15 लाखांचा ऐवज जप्त केला.

या टोळीतील सर्व संशयित परप्रांतीय असून भाडेपट्टीवर हॉलिडे होम्स कॉल सेंटर सुरू करून अमेरिकेतील बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून अमेरिकनांची फसवणूक करत होते.

या छाप्यात अटक केलेल्या संशयितांमध्ये विनय मकवाना (वय ३२, अहमदाबाद गुजरात), घाची अल्फर्झ (वय २८, गुजरात), आकाश बिस्वा (वय २३, शिलाँग, मेघालय), आकाश सुनार (वय २३, मेघालय), केसंग तमंग (वय २२, प. बंगाल), राहुल सरसार (वय २९, मुंबई), अजय बिस्वा (वय २५, मेघालय), तन्मय दासगुप्ता (वय २०, नागालॅण्ड), रेहान शेख (वय २७, मुंबई) यांना अटक केली आहे.

गुन्हे शाखेला माजोर्डा येथे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली. मंगळवारी रात्री संशयित अमेरिकन नागरिकांशी या कॉल सेंटरवरून संवाद साधून त्यांची फसवणूक करत असताना छापा टाकण्यात आला.

गुन्हा शाखेने छापा टाकून ९ संशयितांना अटक केली तसेच हेडफोनसह ९ लॅपटॉप, ९ राऊटर, २ मॉडेम, ९ मोबाईल फोन, ॲक्सेसरीज केबल्स आणि ६५ हजारांची राेकड मिळून १५ लाखांचा ऐवज जप्त केला.

संशयितांनी एक्स-लाईट नावाच्या ॲपवरून लॅपटॉपच्या मदतीने व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करून अमेरिकन नागरिकांची माहिती मिळवली.

...तर हॉटेल मालकावरही कारवाई

संशयितांना आरवन हॉलिडे होम्समध्ये भाडेपट्टीवर जागा देण्यात आली होती. त्यामुळे या हॉलिडे होम्सच्या मालकाने संशयित भाडेकरूंचा फॉर्म पोलिस स्थानकात दाखल केला होता का याचीही शहानिशा पोलिस करत आहेत. त्यात निष्काळजीपणा आढळून आल्यास हॉटेल मालकावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

युनायटेड स्टेट बँकेचे अधिकारी असल्याचे सांगायचे!

अमेरिकन नागरिकांना कॉल करून युनायटेड स्टेट बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून संशयित त्यांना फसवायचे. ज्यांचे बँकेत कमी पैसे आहेत, त्यांना ते कर्ज देऊ, असे सांगत. क्रेडिट स्कोअर कमी असल्याने दंड भरा, असे सांगून पैसे उकळायचे.

‘गुगल पे’द्वारे ते पैसे ट्रान्सफर करण्यास सांगायचे. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचे भारतीय चलनात रूपांतर करून घ्यायचे. काहींनी भीतीपोटी त्यांना पैसे ट्रान्स्फर केल्याचे आढळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT