Arrest|Jail|Crime Canva
गोवा

Goa Crime: कॉन्‍स्‍टेबल आत्‍महत्‍या प्रकरण! ‘त्या’ दोन महिला पोलिसांना अटक; प्रेमप्रकरणावरुन सतावणूकीचे सापडले 'कॉल्स'

Goa Crime News: पोलिस खात्यात नव्यानेच रुजू झालेला कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिला कॉन्स्टेबल्स प्रीती बापू चव्हाण (२३, रा. पर्वरी) व तनिष्का अशोक चव्हाण (२१, रा. पर्वरी) या दोघा चुलत बहिणींची आज क्राईम ब्रँचने दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Two Women Constables Arrested for Abetting Constable Gawade's Suicide

पणजी: पोलिस खात्यात नव्यानेच रुजू झालेला कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिला कॉन्स्टेबल्स प्रीती बापू चव्हाण (२३, रा. पर्वरी) व तनिष्का अशोक चव्हाण (२१, रा. पर्वरी) या दोघा चुलत बहिणींची आज क्राईम ब्रँचने दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा अटक केली. त्यांच्या भावालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले

असून त्यालाही अटक होऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. प्रथमेश गावडे याने त्याच्या मृत्यूस हे तिघेही जबाबदार असल्याचा आरोप आत्महत्येपूर्वी काढलेल्या व्हिडिओत केला आहे.

वास्को रेल्वे पोलिस स्थानकात सेवेत असलेल्‍या कुंकळ्ळी येथील कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याने झुआरी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच मोबाईलने व्हिडिओ काढून तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता. त्यात त्याने प्रेमिका प्रीती चव्हाण व तिची बहीण तनिष्का चव्हाण व तिचा भाऊ आकाश चव्हाण या तिघांनी मानसिक त्रास दिल्याचा तसेच धमक्या देत असल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

क्राईम ब्रँचने प्रीती चव्हाण व तनिष्का चव्हाण यांच्या मोबाईलवरून प्रथमेश गावडे याला केलेल्या कॉल्सची माहिती जमा केली होती. प्रथमदर्शनी या दोघा बहिणींनी त्याची सतावणूक करण्यासाठी कॉल्स केल्याचे दिसून येत आहे. त्यांचा भाऊ आकाश चव्हाण याची या प्रकरणातील भूमिका याची माहिती आता मिळवण्यात येत आहे.

पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्‍हणून नोंद केली होती. मात्र त्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्‍या आत्महत्येमागील कारण नमूद केले होते. त्यामुळे वास्को पोलिस चौकशी करत असतानाच हे प्रकरण काल क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले.

प्रेमप्रकरणाला मुलीच्‍या कुटुंबाचा होता विरोध

प्रथमेश गावडे याची पोलिस प्रशिक्षणादरम्यान प्रीती चव्हाण या महिला कॉन्स्टेबलशी मैत्री झाली होती व त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले होते. दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. या विवाहाला प्रीतीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे प्रीतीने त्याच्याशी बोलणे टाळले होते. तिची चुलत बहीण तनिष्का व भाऊ आकाश हे प्रथमेश याला रात्री-अपरात्री फोन करून प्रीतीशी जवळीक न करण्‍याची धमकी देत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT