Goa Traffic Cell | Traffic Violations File Photo
गोवा

Goa Traffic Police: एकाच दिवशी 1924 जणांवर गुन्हा; 10.75 लाखांचा दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Police राज्यात अपघातांची संख्या वाढल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचे सत्र आरंभले आहे. आज, शनिवारी एकाच दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1924 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 10.75 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, दंडाची रक्कम आता वाढवली असूनही वाहनचालकांमधील बेशिस्तीचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यासाठीच पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढवली आहे. जोपर्यंत कायद्याचे पालन करून वाहतूकदारांमध्ये शिस्त येत नाही, तोपर्यंत ही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात नवीन वाहतूक कायद्यांतर्गत दिले जाणारे दंड उशिरा लागू करण्यात आले होते. तोपर्यंत वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण होईल, अशी सरकारला आशा होती; परंतु तसे काहीही झालेले नाही. उलट पणजी आणि इतर शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असताना सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT