Cricket ticket sales scam case Dayanand Narvekar difficulty increased  Dainik Gomantak
गोवा

'तो' खटला चालवण्याची शेवटची संधी, दयानंद नार्वेकरांच्या अडचणीत वाढ

21 वर्षे प्राथमिक अवस्थेतच रखडलेल्या प्रकरणाला न्यायालयाकडून तंबी

दैनिक गोमन्तक

मडगाव : 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2001 साली घडलेल्या पण तरीही अजून प्राथमिक अवस्थेतच रखडलेल्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामन्याचा तिकीटविक्री घोटाळ्यात अभियोग पक्षकडूनच होत असलेल्या हलगर्जीपणाची मडगाव न्यायालयाने (court) गंभीर दखल घेत येत्या सुनावणीस जर अभियोग पक्षाच्या वतीने कुणीही हजर न राहिल्यास हा खटला बाहेर फेकण्यात येईल अशी तंबी दिली आहे.

माजी उपमुख्यमंत्री व गोवा क्रिकेट संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष दयानंद नार्वेकर आणि इतर 11 जणांवर त्यावेळी या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल केल्याने हे प्रकरण देशभर गाजले होते. या प्रकरणानंतर नार्वेकर यांची राजकीय कारकीर्दही धोक्यात आली होती.

मागच्या काही सुनावण्यास अभियोग पक्षाच्या वतीने कोणताही वकील उपस्थित नव्हता. आज हा खटला मडगावचे (Margao) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कार्लो सिल्वा यांच्यासमोर आली असता आजही सरकारी वकील हजर नसल्याने त्यांनी वरील शेरा मारत ही सुनावणी 16 एप्रिलपर्यंत तहकूब केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एप्रिल 2001 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Cricket) सामन्याच्या वेळी लाखो रुपयांच्या बोगस तिकिटे विकण्यात आली होती. त्यामुळे फातोर्डा स्टेडियम लोकांची गर्दी उडाल्याने लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता.

या प्रकरणात सरकार (Government) पक्षातर्फे खटला चालविण्यासाठी दोन विशेष वकिलांची नेमणूक केली होती. त्यातील एकाने यापूर्वीच या प्रकरणातून अंग काढून घेतले. दुसरे वकिलही मागच्या काही सुनावण्या दरम्यान गैरहजर होते.

या महत्वाच्या प्रकरणाकडे अभियोग पक्षाने असे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने आज नमूद केले. आज या सुनावणीस काही संशयितही गैरहजर होते. मात्र यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी त्यांना गैरहजर राहण्याची परवानगी न्यायालयाकडून मंजूर करून घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT