Curchorem Figredo Ground Dainik Gomantak
गोवा

Figredo Ground: क्रिकेटसाठी तयार केलेले पीच जेसीबीने खोदले, फिग्रेदो मैदानावरील प्रकार; कुडचडेतील क्रीडाप्रेमी संतप्त

Curchorem Figredo Ground: काही दिवसापूर्वी सीपीएल ही क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर आयोजित करण्यात आली होती व त्यावेळी आयोजकांनी महाराष्ट्रमधून खास माती आणून क्रिकेट पिच तयार केली होती.

Sameer Panditrao

केपे: पंटेमळ, कुडचडे येथील फिग्रेदो मैदानावरील क्रिकेटची पिच खोदून टाकल्याच्या प्रकार समोर आला आहे. ऐन सुटीच्या दिवसांत हा प्रकार घडल्याने या मैदानावर आयोजित करण्यात आलेले क्रिकेटचे सामने रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. याबाबत क्रीडाप्रेमी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, हे मैदान कुडचडे पालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी होत आहे.

कुडचडे येथे क्रीडापटूंसाठी साग आणि फिग्रेदो अशी दोनच मैदाने आहेत. त्यात नुकतेच सागच्या मैदानाची दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून कोट्यवधींच्या या प्रकल्पाला पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कार्यकाळ अपेक्षित आहे. त्यामुळे पंटेमळ येथील फिग्रेदो मैदानाचा एकमेव पर्याय क्रीडापटूंसाठी शिल्लक होता. काही दिवसापूर्वी सीपीएल ही क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर आयोजित करण्यात आली होती व त्यावेळी आयोजकांनी महाराष्ट्रमधून खास माती आणून क्रिकेट पिच तयार केली होती. तीच पिच जेसीबी मशिनने खोदल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

या मैदानावर लागोपाठ क्रिकेटचे तीन सामने पार पडले आहेत, तर पुढील दोन महिन्यांत आणखीनही सामने याच मैदानावर आयोजित करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे क्रिकेटसाठी तयार करण्यात आली पिच जेसीबीच्या साहाय्याने उकडून काढण्यात आल्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा रद्द झाल्यात जमा आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणा प्रमाणे विद्यार्थ्यांना मे महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी पडणार असली तरी सध्या साडेअकरा वाजता शाळा सोडली जात आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या मैदानाचा वापर खेळण्यासाठी करतात. परंतु आता मधोमध खोदून ठेवण्यात आलेल्या मुलांना क्रिकेट किंवा फुटबॉल खेळता येणार नाही.

दोषींवर कारवाई करा

युनायटेड क्रिकेटर्स ऑफ कुटचडे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. हरेश काकोडकर यांनी यावेळी सांगितले की, कुडचडे स्थित एक शिक्षण संस्था स्वतःला या मैदानाचे केअर टेकर असल्याचा दावा करत असून त्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जमीन मालकाने सभोवतालची स्वतःची जमीन विकून शिल्लक राहिलेली पंधरा हजार पाचशे चौरस मीटर जमीन मैदानासाठी मोकळी सोडली आहे. नियमा नुसार आता त्या जमिनीवर कुडचडे काकोडा पालिकेचा अधिकार असून पालिकाच त्या जमिनीची केअरटेकर आहे. स्वतःला केअर टेकर बनवणाऱ्या त्या शिक्षण संस्थेला या क्रीडा मैदानावर कोणतेही बांधकाम करता येणार नाही, असे हरेश काकोडकर म्हणाले.

पिच पूर्ववत करून द्यावी

महाराष्ट्रातून माती आणून मैदानावर पिच तयार करण्यात आली होती. जून महिन्यात मॉन्सून सक्रिय होणार असल्याने केवळ दीड महिनेच या मैदानाचा आम्हाला वापर करता येणार होता. ती उकडून टाकण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. ज्यांनी हे पिच फोडली आहे त्यांनी ती पुन्हा करून द्यावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

पालिकेने मैदान ताब्यात घ्यावे

काही वर्षांपूर्वी या मैदानावर पॉलिटेक्निक कॉलेज उभारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला. त्यावेळी लोकांसाठी क्रीडा मैदान म्हणून ही जागा जमीन मालकाने सोडली होती. त्यामुळे त्या जमिनीवर कोणतेही बांधकाम करता येत नाही असा दावा करताना हरेश काकोडकर यांनी केला. १९९७ साली पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत तावडे यांनी दिलेल्या आदेशाचा संदर्भ त्यांनी दिला आहे. ज्या संस्थेला देखरेखीसाठी केअरटेकर म्हणून निवडले होते, त्यांनी मैदानाची किती देखरेख केली ते दिसून येत आहे. त्यामुळे कुडचडे ताबडतोब हे मैदान ताब्यात घेऊन मैदानाचा विकास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT