Fish Market Dainik Gomantak
गोवा

मडगाव मासळी मार्केटमधील क्रेट्स चोरून भंगारात विकल्या!

विक्रेत्यांचा आरोप; 12 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा

दैनिक गोमन्तक

मडगाव : येथील होलसेल मासळी मार्केटमध्ये ठेवलेल्या सुमारे दीड हजार क्रेट्सची चोरी करण्यात आली असून त्या कुंकळ्ळी येथील भंगार अड्ड्यावर विकल्याची माहिती होलसेल मासळी विक्रेते संघटनेचे पदाधिकारी इमाम शेख यांनी दिली. त्यांची किंमत सुमारे 12 लाख असून असे प्रकार या मार्केटमध्ये वारंवार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

याबाबत त्यांनी काल बुधवारी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार दिली. मात्र, क्रेट्सची मालकी सिद्ध करू शकणारी काही कागदपत्रे असल्यास ती सादर करा, असे त्यांना सांगण्यात आले. या क्रेट्स कुंकळ्ळीतील भंगार अड्ड्यावर ठेवल्या आहेत, याची माहिती पोलिसांना देऊन आठ दिवस झाले तरी त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, असे शेख यांनी सांगितले. यासंदर्भात फातोर्डाचे पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांना विचारले असता, या साहित्याची कागदपत्रे सादर करण्यास फिर्यादीस सांगितल्याचे नाईक म्हणाले.

भंगार अड्ड्यावर ठेवण्यात आलेले हे क्रेट्स आपलेच आहेत हे सिद्ध कसे करायचे हा पेच सध्या मडगावमधील मासळी विक्रेत्यांमध्ये आहे. क्रेट्सची मालकी सांगणारे शक्यतो कोणतेही कागदपत्र नसल्याने विक्रेत्यांचीही गोची झाली आहे. पोलिसांनी पुरावे सादर करण्यास सांगत हात वर केले आहेत. मात्र नेहमीच होणाऱ्या क्रेट्सच्या चोरीमुळे मासळी विक्रेते त्रस्त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT