वाघुर्मे येथे खांडेपार नदीत क्रेन कोसळली आहे. क्रेनसह नदीत पडलेल्या क्रेन ऑपरेटरचा बुडून मृत्यू झाला आहे. उशिरापर्यंत क्रेनचालकाचा मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. वाघुर्मे येथील सुदर्शन ड्राय डॉकमध्ये ही दूर्घटना घडली. मरण पावलेला क्रेनचालक रामेंद्र कुमार दुलन मांझी (वय 32) हा मूळचा सिवान - बिहार येथील रहिवासी असून त्याचे वास्तव्य सध्या गोव्यात होते. गुरूवारी (दि.05) सायंकाळी ही घटना घडली.
(Crane operator of BIhar dies after crane falls in khandepar river, Vaghurme)
वाघुर्मे येथील म्हादई नदीत सुदर्शन ड्राय डॉकचे काम सुरू असून या डॉकमध्ये सिलिंडर नेण्याचे काम सुरू होते. GA05B0478 या क्रमांकाच्या या क्रेनद्वारे हे सिलिंडर बांधकाम क्षेत्रातून डॉकच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत नेण्यात येत होते. मात्र हे सिलिंडर नेले जात असताना क्रेनचालक रामेंद्र कुमारचे क्रेनवरील नियंत्रण गेल्याने क्रेन नदीत कोसळली. दरम्यान, अपघात झाल्यानंतर क्रेन खाली दबलेल्या बिहार येथील चालक रमेंद्र याचा बुडून मृत्यू झाला आहे.
यावेळी रामेंद्र कुमार क्रेनच्या केबिनमध्ये अडकला. क्रेन पाण्यात बुडाल्याने रामेंद्र कुमारला पाण्याच्या बाहेर येणे शक्य झाले नाही, दूर्घटना घडल्यावर तेथे उपस्थित अन्य कामगारांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, पण रामेंद्र कुमार पाण्यच्या बाहेर येणे शक्य झाले नसल्यामुळे त्याचे बुडून निधन झाले.
याप्रकरणी फोंडा पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. उशिरा क्रेनचालकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवचिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवला. मयताच्या कुटुंबियांना या दूर्गटनेची माहिती देण्यात आली आहे. फोंडा पोलिसांनी या दूर्घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.