Cow dies of eloctrocution at Porvorim: मान्सूनपूर्व सरी गोव्यात बरसायला सुरूवात झाली आहे. सोमवारपासून राज्यात पावसाला सुरूवात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मागील दोन दिवस राज्यात विविध ठिकाणी पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या तळी साचल्या, असेच, पर्वरीत साचलेल्या तळी जवळ वीजेचा झटका लागल्याने भटकी गाय दगावली आहे. GCA मैदानाजवळ ही घटना घडली.
एक भटकी गाय GCA मैदानाजवळून जात असताना जवळ असणाऱ्या वीज खांबाच्या जिवंत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यात पावसाचे साचलेले पाणी आणि सर्वत्र पडलेला कचरा दिसत आहे. येथे वीजेच्या धक्क्याने मृत झालेली गाय देखील दिसत आहे.
याठिकाणी वीजेच्या जिंवत केबल असल्याने अजून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. असे स्थानिकांनी सांगितले.
या घटनेवरून गोवा काँग्रसेने वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पर्वरीत वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे वीजेचा धक्का लागून गाय दगावली आहे. मंत्री सुदिन ढवळीकरांनी गोहत्या केल्याप्रकरणी प्रायश्चित करावे आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील सरकारमधून राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या अमरनाथ पणजीकरांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.