vaccination  Dainik Gomantak
गोवा

Covid-19: गोव्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना लसीकरण आवश्यक

महाराष्ट्र (Maharashtra), केरळ (Kerala) व तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाश्यांवर निर्बंध कर्नाटक प्रशासनाने घातले आहेत.

दैनिक गोमन्तक

काणकोण: महाराष्ट्र (Maharashtra), केरळ (Kerala) व तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाश्यांवर निर्बंध कर्नाटक प्रशासनाने घातले आहेत. कोरोनाचा नवीन घातक व्हेरियंट सापडल्याने हे निर्बंध घालण्यात आले आहेत. गोव्यातून (Goa) कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाश्याची माजाळी तपासणी नाक्यावर कडक तपासणी करण्यात येत आहे.

कोरोना लसीकरणाचे (Vaccination) दोन डोस त्याचबरोबर 72 तासांपूर्वी कोविड निगेटिव्ह दाखला असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्याशिवाय राज्यातील प्रार्थना स्थळे प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. रेस्टॉरंट,लॉजींगमधील कर्मचाऱ्यांची प्रत्येक दहा दिवसानंतर वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी मुलेय मुगळी व पोलिस अधिक्षक सुमन पेडणेकर यांनी सांगितले.सर्वाना करोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे जे नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याखाली कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.माजाळी त्याचप्रमाणे भटकळ तपासणी नाक्यावर पोलिस प्रवाश्याची या संदर्भात तपासणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT