Covid warriors honored by the Verna Industrial Association Dainik Gomantak
गोवा

Goa: वेर्णा औद्योगीक असोसिएशनतर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: वेर्णा औद्योगीक असोसिएशनने आपल्या रौप्य महोत्सवानिमित्त कोविड(Covid 19) योद्ध्यांचा सत्कार आयोजित केला होता. या प्रसंगी कुठ्ठाळी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. सुकोर क्वाद्रोस व इतर सर्व कर्मचाऱ्यांचा तसेच वेर्णा पोलिस स्थानकांच्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला गोव्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मिना व असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन कुंकळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. असोसिएशनतर्फे वेर्णा पोलिस स्थानकाला 3 ई-मोटरसायकली व जिमनेसियम उपकरणेही प्रदान करण्यात आलीआहेत .(Goa)

नंतर असोसिएशनने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासाठी नवजात बालकांसाठीचे काळजी युनिट डॉ. दिपा कुर्रैया आफोंसो व डॉ. इरा आल्मेदा यांच्याकडे सुपुर्द केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी  वेर्णा औद्योगीक असोसिएशनने  गोवा सरकारला सहकार्य करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन हे युनिट देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

तसेच राज्य व देशासाठी औद्योगीक वासाहती हे एक वरदान ठरल्या आहेत . सरकारने उद्योगांना सर्वतोपरी मदत करणे आवश्यक असल्याचे गोव्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मिना यांनी यावेळी सांगितले सांगितले.

असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन कुंकळीकर म्हणाले की," ही संघटना 25 वर्षापुर्वी केवळ 12 जणांना घेऊन सुरु करण्यात आली होती. ही एक औद्योगीक क्षेत्रीतील सर्वोत्कृष्ट संघटना आहे. या असोसिएशनने वसाहतीतील उद्योगांना चालना देण्यासाठी भरीव कामगिरी केल्याचे कुंकळीकर यांनी सांगितले आहे.

तर असोसिएशनने या वसाहतीतील वातावरण चांगल्या रितीने राखण्याचा प्रयत्न केला असुन येथे काम करण्यास उत्साह वाटतो. ही वासाहत म्हणजे राज्याच्या महसुल वाढीची ताकद बनण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT